esakal | जमीनीच्या निरोगी आरोग्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर आवश्यक : डॉ. अनिल दुर्गुडे
sakal

बोलून बातमी शोधा

The use of organic fertilizers is essential for the healthy health of the soil

जमिनीची आरोग्यपत्रीका तसेच मातीपरीक्षण अहवालानुसार जमिनीतील उपलब्ध मुलद्रव्यांची कमतरता तपासून व जमिनीमध्ये सेंद्रीय खतांचा वापर करुन जमीनीचे आरोग्य चांगले राखता येईल, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील मृदा शास्त्रज्ञ डॉ. अनिल दुर्गुडे यांनी केले.

जमीनीच्या निरोगी आरोग्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर आवश्यक : डॉ. अनिल दुर्गुडे

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : जमिनीची आरोग्यपत्रीका तसेच मातीपरीक्षण अहवालानुसार जमिनीतील उपलब्ध मुलद्रव्यांची कमतरता तपासून व जमिनीमध्ये सेंद्रीय खतांचा वापर करुन जमीनीचे आरोग्य चांगले राखता येईल, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील मृदा शास्त्रज्ञ डॉ. अनिल दुर्गुडे यांनी केले. 

संगमनेर महाविद्यालयातील बी. व्होक. (अँग्रीकल्चर अँण्ड सॉईल सायन्स) विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या 'जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन' या विषयावरील वेबिनारमध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड होते. तसेच यावेळी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. एम. एस. मोरे, समन्वयक डॉ. जयश्री कडू, प्रा. आश्विनी तांबे व प्रा. पुनम गुंजाळ आदी ऑनलाईन उपस्थित होते.

डॉ. दुर्गुडे म्हणाले, जमीनीचे आरोग्य व्यवस्थापन करण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार पिक व फळबाग नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच माती परीक्षणाद्वारे खत व्यवस्थापन केल्यास उपलब्ध अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार, खतांमधुन त्या अन्नद्रव्यांचा पिकांना पुरवठा केला जाऊ शकतो. तसेच मातीपरीक्षण करताना वेगवेगळ्या जमिनीमधील व विविध पिकांसाठी मातीचा नमुना घेण्याबाबत मार्गदर्शन केले. सेंद्रिय खतांचा अपुरा पुरवठा व वापर, अयोग्य जमिनीची निवड या बाबींचा पिकांच्या वाढीवर अनिष्ठ परिणाम होऊ शकतो. तसेच क्षारयुक्त, क्षारयुक्त चोपण व चोपण जमिनींची सुधारणा करुन जमिनीचे आरोग्य चांगले राखले जाऊ शकते. सेंद्रीय खतांच्या वापराने जमिनीमध्ये भौतिक गुणधर्म सुधारण्यासाठी मदत होते.

जलसंधारणशक्ती व रासायनिक खतांची कार्यक्षमता, सुक्ष्म जीवाणुंची संख्या वाढते. या सर्वांचा जमिनीच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. जैविक खतांच्या वापरामुळेही जमिनीचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी शेती क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतीत करताना इतरांनाही मार्गदर्शन करण्याचे तसेच प्रात्याक्षिक ज्ञानाचा वापर करुन शेती सुधारण्यावर भेर देण्याचे आवाहन केले. या वेबिनारमध्ये महाविद्यालयातील बी. व्होक. विभागातील प्राध्यापक व 74 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top