जैविक खतांचा वापर ही आगामी काळाची गरज ठरणार

सतीश वैजापूरकर
Saturday, 26 September 2020

जैविक खते व किडनियंत्रित करणारे जैविक सापळे यांचा वापर आगामी काळाची गरज ठरणार आहे.

राहाता (अहमदनगर) : जैविक खते व किडनियंत्रित करणारे जैविक सापळे यांचा वापर आगामी काळाची गरज ठरणार आहे. हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी त्याबाबतचे तंत्र माहीती करून घ्यावे. जैविक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत खराब होत नाही. तर जैविक सापळ्यांमुळे विषमुक्त शेतमाल उत्पन्न होतो. असे प्रतिपादन औरंगाबाद येथील एम. जी. एम. कृषि महाविद्यालयातील कृषिदूत रोहन वाकचौरे यांनी केले.

शहरातील चारी क्रमांक १५ परिसरात आयोजित कृषिदूत शेतक-यांच्या बांधावर या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अमोल सदाफळ, नगरसेवक संजय सदाफळ, मनोज सदाफळ, सुनील वाकचौरे, विष्णूपंत सदाफळ, दत्तात्रय सदाफळ, आदित्य पोखरकर, दादा सदाफळ आदिंसह या परिसरातील शेतकरी उपस्थीत होते.

कृषिदूत वाकचौरे म्हणाले, रासायनीत खतांना पर्यात म्हणून जैविक खतांचा वापर वाढतो आहे. हि चांगली बाब आहे. पिक विमा भरण्या संदर्भात शेतक-यांनी जागरूक रहावे, मोबाईल विवीध कृषि एप आले आहेत. त्याचीही माहीती करून घ्यावी. त्यातील काही एप फार उपयुक्त आहेत. 

या उपक्रमासाठी एम.जी.कृषिमहाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.एन.एम.म्हस्के, कार्यानुभव अधिकारी व्ही.ओ.कोहिरे आदिंचे मार्गदर्शन लाभले. शेतक-यांच्या शंकांना यावेळी कृषिदुत वाकचौरे यांनी उत्तरे दिली. नगरसेवक संजय सदाफळ यांनी आभारप्रदर्शन केले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The use of organic fertilizers will be the need of the hour