बापरे! स्मार्ट फोनच्या वापरामुळे कसले कसले आजार होतात, वाचा तर...

गौरव साळुंके
Tuesday, 1 September 2020

अनेक मातापालक हट्टी मुलांना मोबाईल दाखवत जेवण भरवतात. त्यातून त्यांना सवय लागते. सध्या अनेक शाळांनी ऑनलाइन शिक्षणाचा उपक्रम सुरू केला आहे. त्यातूनही मुलांना मोबाईल देण्यात आले. त्यातून विविध प्रकारचे गंभीर होत आहेत.

श्रीरामपूर (अहमदनगर) ः पूर्वी "मोबाईल' ही चैनीची वस्तू होती. मात्र, सध्याच्या "ऑनलाइन'च्या काळात "स्मार्ट फोन' प्रत्येकाची गरज बनला आहे. देशभरातील 70 कोटींहून अधिक नागरिक मोबाईलचा वापर करतात. यांतील 70 टक्के तरुण आहेत. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार, "स्मार्ट फोन'चा अतिवापर डोळे व मानेसाठी धोकादायक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांच्या निदर्शनास आले आहे.

मोबाईल, स्मार्ट फोन आणि टॅबच्या अतिवापरामुळे डोळे, मान, पाठदुखीच्या समस्या भेडसावत आहेत. लॉकडाउनच्या काळात तर स्मार्ट फोनचा अतिवापर होत आहे. मोबाईलवर सतत बोलत राहिल्यास बहिरेपणा येतो. मुलांनाही सध्या स्मार्ट फोनची सवय लागली आहे. स्मार्ट फोनवर गेम खेळले जातात.

ते आरोग्यास हानिकारक आहे. अनेक मातापालक हट्टी मुलांना मोबाईल दाखवत जेवण भरवतात. त्यातून त्यांना सवय लागते. सध्या अनेक शाळांनी ऑनलाइन शिक्षणाचा उपक्रम सुरू केला आहे. त्यातूनही मुलांना मोबाईल देण्यात आले. दिवसभरात साधारण दोन तास शैक्षणिक उपक्रम सुरू असतो. मात्र, अनेक मुले दिवसभर स्मार्ट फोन हाताळताना दिसतात. 

स्मार्ट फोनच्या अतिवापरामुळे मान सारखी खाली राहते. त्यातून "किल्कनेक सिम्रोन' हा आजार बळावतो. यात मणक्‍यांची झीज होते. परिणामी, दोन्ही हातांना मुंग्या येतात, मानदुखी, तसेच चक्कर येते. स्मार्ट फोनचा वापर शक्‍यतो मर्यादित ठेवावा. मानेचे व्यायाम नियमित करावेत. 
- डॉ. अजिंक्‍य गिरमे, अस्थिरोगतज्ज्

मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांच्या अश्रू पडद्यावर (टियर फिल्म) आघात होतो. त्यामुळे डोळ्यांतील ओलावा कमी होतो. मोबाईलमधून बाहेर पडणाऱ्या किरणांमुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो. परिणामी, डोळे चुरचुरतात, आग होते. बुब्बुळाची ताकद कमी होते. एकटक बघितले गेल्याने डोळे आकुंचन पावतात. 
- डॉ. संजय शेळके, नेत्ररोगतज्ज्ञ 

अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The use of smart phones causes serious illnesses