esakal | शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; ‘युटेक’ गेल्या वर्षीचे 260 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग करणार
sakal

बोलून बातमी शोधा

The Utech factory will deposit Rs 260 in the farmer's bank account

तीन गळीत हंगामांत आलेल्या बऱ्या-वाईट अनुभवांसह, कोरोना संकटातील कटू अनुभवांच्या शिदोरीवर, ऊसउत्पादकांच्या विश्वासामुळे युटेक शुगरचा चौथा गळीत हंगाम सुरू झाला.

शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; ‘युटेक’ गेल्या वर्षीचे 260 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग करणार

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : तीन गळीत हंगामांत आलेल्या बऱ्या-वाईट अनुभवांसह, कोरोना संकटातील कटू अनुभवांच्या शिदोरीवर, ऊसउत्पादकांच्या विश्वासामुळे युटेक शुगरचा चौथा गळीत हंगाम सुरू झाला. अन्य कारखान्यांशी स्पर्धा करण्यापेक्षा ऊसउत्पादकांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे उद्दिष्ट आहे.

मागील हंगामात जाहीर केलेल्या 2511 रुपये दरातील उर्वरित 260 रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग करून त्यांची दिवाळी गोड करणार आहे,'' असे प्रतिपादन युटेक शुगरचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बिरोले यांनी केले. तालुक्‍यातील कौठे मलकापूर येथील युटेक शुगर कारखान्याच्या चौथ्या गळीत हंगामाचा प्रारंभ गव्हाणीत उसाची मोळी टाकून झाला. त्या वेळी बिरोले बोलत होते. 

ते म्हणाले, ""यंदा कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून, जास्तीत जास्त गाळपाचे उद्दिष्ट आहे. मागील हंगामात झालेले आर्थिक नुकसान व कोरोना संकटात अनेकांनी दिलेल्या नाहक त्रासामुळे मनस्ताप झाला. मात्र, आपण दराचा शब्द पाळणार आहोत. दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांचे मागील वर्षाचे उर्वरित 260 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग केले जाणार आहेत. शेतकऱ्यांनी ऊसतोडीसाठी कारखाना प्रशासनाशी संपर्क साधावा.'' 

कारखान्याच्या संचालक अश्विनी बिरोले, शंतनू बिरोले, ईशा बिरोले, पौर्णिमा पारेख, नंदन बिरोले, ऍड. रामदास शेजूळ, भाऊसाहेब शेजूळ, हरिभाऊ गिते, सुभाष कोळसे, बापू धुळगंड, एकनाथ नागरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुकदेव शेटे, तान्हाजी बागूल, एकनाथ वर्पे, रामदास रहाणे आदी उपस्थित होते. 

हंगामी कामगारांना पगारवाढ 
मागील तीन हंगामांत कार्यरत असलेल्या हंगामी कामगारांना 20 टक्के, दोन हंगामांतील कामगारांना 15 टक्के, तर मागील हंगामापासून कार्यरत हंगामी कामगारांना 10 टक्के पगारवाढ देण्यात आली आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image