स्थानिकांना डावलून बाहेच्यांना लस, गर्दीमुळे वादावादी

दुर्धर आजार असलेल्यांना कुपन देऊन लसीकरण
कोविशिल्ड लस
कोविशिल्ड लसMedia Gallery

अमरापूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नागरीकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी शासनाने सुरु केलेल्या लसीकरणावर लोकांच्या उड्या पडल्या आहेत. सुरुवातीला 45 वयाच्या पुढील व्यक्तींना दिली जाणारी लस आता 18 ते 45 वयोगटासाठी ऑनलाईन नोंदणी करुन देण्यात येवू लागल्याने आरोग्य केंद्रावर गर्दी होवू लागली आहे. मात्र, ऑनलाईन नोंदणीमुळे स्थानिकांऐवजी बाहेरच्यांनाच लस मिळू लागल्याने संताप व्यक्‍त होत आहे. (Vaccination done to others instead of locals in Shevgaon)

कोविशिल्ड लस
रानडुकरांची शिकार करणाऱ्यास अटक

शेवगाव तालुक्‍यातील कोरोना लसीकरणात सुसुत्रता यावी यासाठी शेवगाव व बोधेगाव येथील ग्रामिण रुग्णालयासह दहिगाव-ने, भातकुडगाव, ढोरजळगाव, हातगाव, घोटण या आरोग्य केंद्रात लसीकरण सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. 45 वयापुढील व्यक्तींना व दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्यांना लस देताना प्रथम आलेल्यांना कुपण देवून लसीकरण करण्यात येत होते.

यासाठीही नागरीक भल्या पहाटेपासून लसीकरण केंद्रावर रांगा करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रशासनाने गर्दी व गैरसोय टाळण्यासाठी लस उपलब्ध झाल्यास त्यासाठी आँनलाईन नोंदणीचा पर्याय उपलब्ध केला.

तालुक्‍यातील व्यक्तींना लस मिळण्याऐवजी बाहेरच्या जिह्यातील व तालुक्‍यातील व्यक्तींना नावनोंदणी मुळे लस द्यावी लागत आहे. या प्रकारामुळे लसीकरणासाठी नागरीकांचा इतरत्र सुरु झालेला प्रवास संसर्गासाठी बाधक ठरु शकतो.

ऑनलाईन कोणी कोठुनही त्याचे बुकींग करु शकते. त्यामुळे जवळ असणाऱ्या इतर जिह्यातील व तालुक्‍यातील उपलब्ध असलेल्या केंद्राचा पर्याय नागरीक निवडत आहेत. तालुक्‍याच्या पूर्व भागातील जालना, बीड व औरंगाबाद येथील नागरीकांना तालुक्‍यातील अनेक केंद्रे सोयीचे वाटते. संपूर्ण राज्यस्तरावर नोंदणी सुरु असल्याने स्थानिक प्रशासनाच्या हस्तक्षेपाशिवाय लसीकरण करावे लागते.

वादाचे प्रकार होण्याची शक्‍यता

लसीकरणासाठी नागरीक मेटाकुटीस आले असताना स्थानिक व बाहेरचे असा वाद या आँनलाईन पध्दतीमुळे उफाळून येणार आहे. शहरातील काही नागरीकांनी लसीकरण केंद्रावर बाहेरुन लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरीकांना प्रवेश दारातच गुलाबपुष्प देवून परत पाठवणार असल्याचे सांगितले. या प्रकारामुळे वादाचे प्रकार घडण्याची शक्‍यता आहे.(Vaccination done to others instead of locals in Shevgaon)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com