
कागद, काच, पत्रा वेचणाऱ्यांसाठी कष्टकरी पंचायत अनेक वर्षांपासून काम करीत आहे. या कामगारांनी 'स्वच्छ भारत प्लॅस्टिक निर्मूलन' कार्यक्रमात सहभाग घेतला होता. नंतर महापालिकेने संघटनेच्या कामागारांना ओळखपत्र दिले.
अहमदनगर : शहरात कागद, काच, पत्रा गोळा करणाऱ्या असंघटीत कामगारांना महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनात समावेश करून त्यांना रोजगार मिळवून द्यावा, अशी मागणी कष्टकरी पंचायतीचे विकास उडाणशिवे यांनी केली आहे. यासंदर्भात उडाणशिवे यांनी आज महापालिका सहायक आयुक्त सचिन राऊत यांना दिले.
कागद, काच, पत्रा वेचणाऱ्यांसाठी कष्टकरी पंचायत अनेक वर्षांपासून काम करीत आहे. या कामगारांनी 'स्वच्छ भारत प्लॅस्टिक निर्मूलन' कार्यक्रमात सहभाग घेतला होता. नंतर महापालिकेने संघटनेच्या कामागारांना ओळखपत्र दिले. तसेच, 180 सभासदांना तीन वर्षांचा अपघातविमा संरक्षण शासनामार्फत देण्यात आले.
सध्या कचरावेचकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांचा समावेश महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनात करावा, अशी मागणी उडाणशिवे यांनी केली आहे. ज्योती शिंदे, शीतल शिंदे, मीना चांदणे, वनिता घोरपडे, लक्ष्मी भालेकर, मंगल घोरपडे, दीपाली घोरपडे, रेखा साळवे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.
संपादन - सुस्मिता वडतिले