विखे पाटलांच्या लोणी बुद्रुकची बिनविरोधची परंपरा कायम

रवींद्र काकडे
Tuesday, 5 January 2021

लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

लोणी ः लोणी बुद्रुक ग्रामस्थांनी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सलग 25 वर्षे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची प्रथा यंदाही राखत आदर्श निर्माण केला आहे. 

लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आज माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह गावातील ज्येष्ठ व्यक्तींनी संवाद साधून निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला. 

सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व मिळेल अशा दृष्टीने, सहमतीने उमेदवार निश्‍चित केल्याने, निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. 

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार असे ः प्रभाग 1 - भाऊसाहेब धावणे, मंजुश्री साबळे, उज्ज्वला बोरसे. प्रभाग 2- रामनाथ विखे, गणेश विखे, कल्पना मैड. प्रभाग 3- प्रवीण विखे, उषा विखे. प्रभाग 4- मयूर मैड, दिलीप विखे, शोभा विखे. प्रभाग 5- दीपक विखे, सुनीता चव्हाण, सिंधूबाई म्हस्के. प्रभाग 6- मध्ये सचिन ब्राह्मणे, कविता दिवटे, सुचित्रा विखे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vikhe Patal's Loni Budruk's unopposed tradition continues