esakal | विखे पाटील कुटुंबाचा श्रीगोंद्यातील कोविड सेंटरला आधार

बोलून बातमी शोधा

विखे पाटील कोविड सेंटर भेट
विखे पाटील कुटुंबाचा श्रीगोंद्यातील सर्व कोविड सेंटरला आधार
sakal_logo
By
टीम ई सकाळ

श्रीगोंदे : खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी तालुक्यातील कोविड सेंटरला भेट देत रुग्णांची आस्तेवाईकपणे चौकशी केली. केंद्रांचा आढावा घेतानाच लोकसहभागातील कोविड सेंटरला पन्नास हजार तर शहरातील सेंटरला एक लाखाची मदत विखे पाटील कुटुंबाच्या वतीने केली.

डॉ. विखे पाटील यांनी आज तालुक्यातील कोळगाव, घारगाव, पिंपळगाव पिसे, बेलवंडी, लोणी व्यंकनाथ व शहरातील शासकीय कोविड सेंटरला भेट दिली.

प्रत्येक ठिकाणी त्यांनी थेट रुग्णांशी संवाद साधत अडचणी समजून घेत तब्बेतीची चौकशी केली. यावेळी त्यांनी सेंटरमधील डॉक्टरांना काही रुग्णांना ऑक्सिमीटर लावून ऑक्सिजन तपासायला लावत खात्री केली. विखे पाटील कुटुंबातर्फे शासकीय कोविड सेंटरला १ लाख व खाजगी कोविड सेंटरला प्रत्येकी ५० हजार रुपयांचे धनादेश दिले.

आमदार बबनराव पाचपुते यांच्यासह अण्णा शेलार, सिद्धेश्वर देशमुख, पुरुषोत्तम लगड, बाळासाहेब नाहाटा, तहसीलदार प्रदीप पवार, गटविकास अधिकारी प्रशांत काळे उपस्थित होते.

बातमीदार - संजय आ. काटे