esakal | विखे पाटील म्हणतात, महाविकास आघाडी सरकारने शिवजयंतीचे महत्त्व कमी केलं

बोलून बातमी शोधा

Vikhe Patil says that the Mahavikas Aghadi government has downplayed the importance of Shiv Jayanti}

एकीकडे कोरोनाचे कारण सांगून जयंती दिनाच्या कार्यक्रमावर बंधने आणली जातात; मात्र दुसरीकडे सत्तेत भागीदार असणाऱ्या कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभात सर्व नियम तोडून गर्दी होते. 

ahmednagar
विखे पाटील म्हणतात, महाविकास आघाडी सरकारने शिवजयंतीचे महत्त्व कमी केलं
sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवर कायद्याची बंधने घालणाऱ्या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना, कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा आणि मंत्र्यांच्या मिरवणुकांमध्ये झालेली गर्दी दिसत नाही का?

छत्रपतींच्या नावाने राजकारण करणाऱ्या शिवसेनेनेच महाराजांच्या जयंती दिनाचे महत्त्व कमी केल्याची खंत वाटते, अशी टीका आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर केली.

शिवजयंतीनिमित्त माळवाडी (शिबलापूर) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विखे पाटील म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 391 वर्षांनंतरही तेवढ्याच उत्साहाने साजरी होते. एकीकडे कोरोनाचे कारण सांगून जयंती दिनाच्या कार्यक्रमावर बंधने आणली जातात; मात्र दुसरीकडे सत्तेत भागीदार असणाऱ्या कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभात सर्व नियम तोडून गर्दी होते. 

जिल्हा परिषद सदस्य रोहिणी निघुते, गुलाब सांगळे, भगवानराव इलग, रखमा खेमनर, दिनकर गायकवाड, संदीप घुगे, तबाजी मुन्तोडे, सरपंच सचिन गायकवाड, उपसरपंच दिलीप मुन्तोडे आदी उपस्थित होते.