कर्जतचे डॉ. विलास काकडे यांचे निधन... शेवटी म्हणाले होते....

Vilas Kakade passed away
Vilas Kakade passed away

कर्जत ः कर्जत शहरातील प्रसिद्ध डॉक्टर विलास काकडे (बाबा) यांचे आज पहाटे निधन झाले. शरीरातील अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यूने त्यांना गाठले.  त्यांच्यामागे आई, पत्नी, एक मुलगा व विवाहित मुलगी असे कुटुंबीय आहे. मुलगा हा डॉक्टर असून रेडिओलॉजिस्ट आहे.

काकडे यांच्या निधनामुळे  शहर आणि तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या बाबत  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी निधनाच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. ते अखेरच्या श्वासापर्यंत रुग्ण सेवेत होते.

कर्जत शहरात सर्वात हुशार आणि अनुभवी डॉक्टर अशी त्यांची ओळख  होती. त्यांच्या उपचारामुळे अनेक जण मृत्यूच्या दाढेतून परत आले आहेत. अशी त्यांची ख्याती कर्जतसह शेजारील करमाळा, जामखेड, आष्टी, श्रीगोंदासह नगर जिल्ह्यात होती.

कर्जत तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला. मात्र, कित्येक दिवस शहर मात्र अपवाद होते. येथे एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र, शहरातही कोरोना आला. 

नगर येथे एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथे डॉ. विलास काकडे यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला होता. ते प्रकृती सुधारत उपचाराला प्रतिसाद देत होते. मात्र, त्यांच्या शरीरातील इतर अवयव हळूहळू निकामी होत असल्याने त्यांना पुणे येथे खाजगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी नेण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना आज ( ता 27) रोजी पहाटे त्यांचे निधन झाले.  ते लवकर बरे व्हावेत यासाठी सर्वधर्मीय प्रार्थना ,कुराण पठण, होमहवन करण्यात आले. मी लवकरच रुग्ण सेवेत हजर होईल, हे त्यांचे अखेरचे शब्द होते. परंतु काळाने ते सत्यात उतरू दिले नाही.

कर्जत शहरासह तालुक्यावर शोककळा

डॉ.विलास काकडे यांचे निधनाचे वृत्त समजताच कर्जत शहरावर आणि तालुक्यावर शोककळा पसरली आहे. वैद्यकीय क्षेत्रामध्ये तर प्रचंड धक्का बसला आहे. डॉ. काकडे हे बाबा या टोपणनावाने सर्वपरिचित होते. शहरातील व बाहेरील अनेक नवोदित प्रॅक्टिस करणारे डॉकटर्स नियमित त्यांचे मार्गदर्शन आणि सल्ला घ्यायचे. डॉक्टरांना सोशल मीडियात प्रत्येक वर्गातून श्रद्धांजली वाहिली जात आहे.

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com