esakal | निसर्गसौंदर्य लाभलेले, पण नरकयातना भोगणारे फोफसंडी
sakal

बोलून बातमी शोधा

fofsandi

निसर्गसौंदर्य लाभलेले, पण नरकयातना भोगणारे फोफसंडी

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (जि. नगर) : तालुक्यातील फोफसंडीत निसर्गाचा आविष्कार पाहायला मिळतो. घाटरस्ता, उंचच उंच डोंगरदऱ्यांत लपलेले हे गाव अतिशय सुंदर आहे. उंच डोंगरावरून फेसाळत येणारे धबधबे व भन्नाट वाऱ्यामुळे पर्यटक येथे आकर्षित होतात. भन्नाट निसर्गसौंदर्य लाभलेले या गावातील ग्रामस्थ मात्र अक्षरश: नरकयातना भोगत आहेत. (villagers fofsandi village akole taluka are living in bad condition)

ब्रिटिश अधिकारी फोफ यांच्या नावाने परिचित असलेल्या या फोफसंडीत सकाळी एक तास उशिरा सूर्य दिसतो, तर सायंकाळी एक तास लवकर डोंगराआड तो लुप्त होतो. पावसाळ्यात जे शेतात उगवेल, ते पदरात पाडून आठ महिने रोजंदारीसाठी पुणे व ठाणे जिल्ह्यात येथील ग्रामस्थ जातात. म्हातारी माणसे व लहान मुले घरीच राहून जनावरे सांभाळतात.

हेही वाचा: प्रेमप्रकरणातून श्रीरामपुरात गोळीबार; एक जण जखमी

घरे जुन्या धाटणीची, वीट- माती- दगड रचून वर कौले वा पत्रे टाकून बनविलेली आहेत. बोटावर मोजण्याइतकीच घरकुले मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. काही घरांत गॅसजोड आहेत, तर बहुतांश घरांत चुलीवरच स्वयंपाक बनविला जातो. गावात गिरणी, शाळा, केंद्रीय आश्रमशाळा असली, तरी प्रचंड गैरसोयी आहेत. रस्ता, तसेच अनेकांच्या घरांत वीज नाही. अनेकांना घरेच नाहीत. येथील ग्रामस्थांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. त्यामुळे ते अक्षरशः नरकयातना भोगत आहेत.

फोफ नावाचा ब्रिटिश अधिकारी दर रविवारी गावात यायचा. त्यामुळे गावाला फोफसंडी नाव पडल्याचे ७५ वर्षीय भिवा पिलाजी वळे यांनी सांगितले. चार पिढ्यांपासून आम्ही या गावात राहतो. गावात बारा वाड्या, तसेच आवाडे, कोंडार, भगत, पिचड, तातले, गोरे, उंबरे, गवार, मेमाणे, भांगरे व भद्रिके अशा आडनावाचे लोक येथे राहतात. जनावरे पाळणे, पावसाळ्यात भात, नागली, वरई आदी पिके घेऊन इतर आठ महिने रोजंदारीसाठी पुणे जिल्ह्यातील कोपरे, मांडवे, ओतूर, बनकर फाटा येथे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

(villagers fofsandi village akole taluka are living in bad condition)

हेही वाचा: 'समृद्धी’साठी नगर जिल्ह्यात ८२५ हेक्टर क्षेत्राचे होणार भूसंपादन

loading image
go to top