esakal | अकोले तालुक्यात उसाच्या आगारात केली भात शेती 
sakal

बोलून बातमी शोधा

Vitha and Chitalvedhe paddy cultivation increased in Akole taluka

विठा, चितळवेढे शिवार म्हटले, की उसाचे आगार, मुबलक पाणी. त्यामुळे विठा, चितळवेढे, निंब्रळ, निळवंडे, ठाकरवाडी परिसरातील बागायती शेतीला तोड नाही.

अकोले तालुक्यात उसाच्या आगारात केली भात शेती 

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : तालुक्‍यातील विठा, चितळवेढे शिवार म्हटले, की उसाचे आगार, मुबलक पाणी. त्यामुळे विठा, चितळवेढे, निंब्रळ, निळवंडे, ठाकरवाडी परिसरातील बागायती शेतीला तोड नाही.

त्यामुळे "अगस्ती'ला मोठ्या प्रमाणात ऊस याच परिसरातून जातो. येथील शेतकरी प्रयोगशील आहेत. उसात आंतरपीक घेऊन आपले उत्पादन व उत्पन्नवाढ कशी होईल, याचे वर्षभर नियोजन करतात. 

बारमाही शेतीतून भाजीपालानिर्मितीकडे त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे उसाच्या आगारातील शेतीत विठा पोलिस पाटील व शेतकरी दत्तात्रेय वाकचौरे पावसाळ्यात आपल्या दोन एकर क्षेत्रात इंद्रायणी भाताची लागवड करून मोठे उत्पादन घेतात. विठा व चितळवेढे रस्त्याच्या कडेला त्यांची शेती आहे. भात ओंबीत आल्यावर सुगंध सर्वत्र दरवळतो. सेंद्रिय पद्धतीने भातलावणी करून ते उसाच्या शेतीबरोबरच तांदळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात.

मुंबई, पुणे येथे त्यांना ग्राहक आहेत. 50 रुपये किलोने त्यांचा तांदूळ अगोदरच बुक होतो. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून इतर शेतकरीही आता उसाच्या आगारात भातशेती करू लागले आहेत. याबाबत दत्तात्रेय वाकचौरे म्हणाले, की माझ्या शेतातील इंद्रायणी तांदूळ चवदार आहे. सेंद्रिय खत वापरून भात पिकवतो. एकदा माझ्याकडे घेतलेला तांदूळ ग्राहक दर वर्षी माझ्याकडूनच घेतो, असे त्यांचे म्हणणे आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर