Sujay Vikhe Patil : सुजय विखे म्‍हणतात...तर वाजवा तुतारी; समाज माध्यमावरील व्हायरल व्हिडिओची चर्चा

‘आमची अडचण होत असेल, तर तुतारी वाजून टाका’ असे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओची नगर जिल्ह्यासह राज्यभर जोरदार चर्चा सुरू होती.
vote tutari of sharad pawar group nilesh lanke sujay vikhe patil video goes viral
vote tutari of sharad pawar group nilesh lanke sujay vikhe patil video goes viralSakal

अहमदनगर : ‘आमची अडचण होत असेल, तर तुतारी वाजून टाका’ असे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओची नगर जिल्ह्यासह राज्यभर जोरदार चर्चा सुरू होती. विखे पाटील यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नीलेश लंके आहेत. त्यांचे चिन्ह तुतारी आहे.

जिल्ह्यात एका ठिकाणी कार्यकर्त्यांची बैठक होती. त्यामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विखे पाटील म्हणतात, की‘‘तुमच्या जीवावर आम्ही राजकारण करतो. आज भाजपचा कार्यकर्ता समाजात वावरत असताना काय बोलतो, याला खूप महत्त्व आहे. आपण जेवढ्या ताकदीने आपल्या नेत्याची बाजू मांडू, मोदींची बाजू मांडू.

आता प्रत्येकाला सगळेच मान्य आहेत का, तर नाही. काही लोकांना सुजय विखे मान्य नसतील, तर मोदींचे नाव सांगा. आम्ही दोघे मान्य नसतील, तर ताईंचे नाव सांगा. तिघांचे नसेल, तर अरुण मुंडेंचे सांगा. आमच्या सगळ्यांचे नसेल, तर तुतारी वाजून टाका. संपलं, याच्या पलीकडे आता काय करणार? माणूस कुठून आणायचा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com