
शिर्डी: शिर्डी विधानसभा मतदारसंघातील सामान्य जनता आणि महायुतीचे उमेदवार महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या परस्पर विश्वास आणि स्नेहाचे अतुट नाते तयार झाले आहे. येथील जनता हा आपला परिवार आहे असे गृहित धरून, त्यांनी एक जागरूक लोकप्रतिनिधी या नात्याने मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला आहे. विरोधकांच्या निंदा नालस्तीच्या प्रचाराला बळी न पडता, विकासाच्या मुद्यावर विखे पाटलांना विधानसभेत सलग आठव्यांदा पाठविण्याचा निर्धार जनतेने केला आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांनी केले.