Vriddheshwar Devasthan will continue to be funded - Kardile
Vriddheshwar Devasthan will continue to be funded - Kardile

वृद्धेश्वर देवस्थानला यापुढेही निधी देणार - कर्डिले

तिसगाव : श्री क्षेत्र वृद्धेश्वर देवस्थानच्या विकासासाठी यापूर्वीही मोठ्या प्रमाणात निधी दिला. यापुढेही निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिले. घाटशिरस (ता .पाथर्डी) येथे श्री वृद्धेश्वर देवस्थान परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविण्याच्या कामाचा प्रारंभ कर्डिले यांचे हस्ते करण्यात आला.

यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मोनिकाताई राजळे या होत्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्या संध्याताई आठरे. पुरुषोत्तम आठरे रविंद्र, वायकर, प्रवीण परदेशी आदी उपस्थित होते.

तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत जिल्हा परिषद सदस्य संध्याताई आठरे यांच्या विशेष प्रयत्नातून पेहींग ब्लॉक बसवणे खर्च सात लाख रुपये या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी बोलताना कर्डिले म्हणाले की वृद्धेश्वर हे देवस्थान लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे.मोनिकाताई राजळे व सुजय विखे पाटील व माझ्या प्रयत्नातून लवकरच तीर्थक्षेत्र ब दर्जा मिळवून देणार आहोत. देवस्थानच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविणार आहे त्यासाठी ताबडतोब प्रस्ताव तयार करा अशा सुचना आधिकाऱ्यांना दिल्या. सध्या सुरू असलेले दगडी काम खूपच सुंदर आहे त्यासाठी आणखी निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मात्र यामध्ये राजकारण होऊ नये अशी अपेक्षा कर्डिले यांनी यावेळी व्यक्त केली.

देवस्थानचे दिवंगत अध्यक्ष सुधाकर पालवे यांच्या आठवणींना उजाळा देताना कर्डिले म्हणाले की देवस्थानच्या विकासासाठी पालवे नेहमी सक्रिय असत. सतत देवस्थान साठी कोणता निधी द्याल अशी विचारणा करून निधीसाठी मागणी करायचे पालवे यांच्या अपेक्षित असा देवस्थानचा विकास करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा निधी आम्ही कमी पडू देणार नसल्याचे कर्डीले यावेळी म्हणाले.

देवस्थानचा विकास झाल्यास ग्रामपंचायतचा देखील विकास होईल त्यामुळे ग्रामपंचायत मीही या कामी लक्ष घालण्याची गरज आहे.पाण्याचा प्रश्न पार्किंग स्वच्छतागृह तसेच परिसरात वृक्षारोपण आधी कामांना मोठ्या प्रमाणात निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मोनिकाताई राजळे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बाबा खरसे ,सुरेश चव्हाण, संतोष शिंदे, ह भ प शिंदे गुरुजी ,सरपंच तथा अध्यक्ष देवस्थान अध्यक्ष गणेश पालवे, बंडू पाठक ,शरद पडोळे ,विष्णू पाठक ,मुरलीधर पाठक, लक्ष्मण पाठक ,व्यवस्थापक शिवाजी पालवे, कानिफ पालवे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक पुरुषोत्तम आठरे यांनी केले. सूत्रसंचालन रामदास पालवे यांनी केले. आभार बंडू पाठक यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com