पुणे- पारनेर तालुक्याचे अंतर होणार २५ किलोमीटरने कमी

अनिल चौधरी
Saturday, 3 October 2020

नगर व पुणे जिल्ह्याला जोडणारा व दळणवळणासाठी उपयुक्त ठरणारा कुकडी नदीवरील पुलासाठी केंद्राकडे पाठपुरावा करून लवकरच उभारणार असल्याची माहिती खासदार अमोल कोल्हे यांनी दिली.

निघोज (अहमदनगर) : नगर व पुणे जिल्ह्याला जोडणारा व दळणवळणासाठी उपयुक्त ठरणारा कुकडी नदीवरील पुलासाठी केंद्राकडे पाठपुरावा करून लवकरच उभारणार असल्याची माहिती खासदार अमोल कोल्हे यांनी दिली. 

पारनेर पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर यांच्यासह शिष्टमंडळाने खासदार कोल्हे यांची भेट घेऊन या पुलाची मागणी केली. बाबर यांनी अनेक वर्ष प्रलंबित असणाऱ्या वडनेर बु. (पारनेर) आणि वडनेर खुर्द(ता. शिरुर) गावाला जोडणाऱ्या कुकडी नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात यावे, यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी शिरुरचे माजी आमदार पोपटराव गावडे, सचिन भालेकर, रणजित बाबर आदी उपस्थित होते. 

खासदार कोल्हे म्हणाले, दोन्ही वडनेर ही गावे नगर - पुणे जिल्हांच्या सरहद्दीवर असून दोन्ही गावांमधून कुकडी नदी वाहते. कुकडी नदीवर पूल बांधण्यापूर्वी शिरुर तालुक्‍यातील वडनेर खुर्द - टाकळी हाजी - मलठण - शिक्रापूर मार्ग आणि पारनेर तालुक्‍यातील वडनेर बु - निघोज - पिंप्रीजलसेन - पारनेर हे मार्ग इतर जिल्हा मार्ग असल्यामुळे हा प्रश्‍न अनेक वर्ष प्रलंबित होता. या मार्गांना जिल्हा मार्गाचा दर्जा द्यावा लागेल आणी वडनेर खुर्द ते ब्राम्हणठिका हा मार्ग त्या समाविष्ठ करुन हा मार्ग पंतप्रंधान ग्रामसडक योजनेत बसवून सदर कुकडी नदीवरील पुलाचा मार्गी लावण्या येईल. त्यासाठी अहमदनगरचे खासदार डॉ.सुजय विखे यांचीही मदत लागणार आहे. त्यासाठी खासदार विखे व मी संयुक्त प्रयत्न करुन प्रश्न मार्गी लावू. 

माजी आमदर पोपटराव गावडे म्हणाले, की कुकडी नदीवर पूल व्हावा, ही दोन्ही गावांची अनेक वर्षांची मागणी असून कुकडी नदीवर पूल झाल्यानंतर पारनेर तालुक्‍यातील वडनेर, शिरापूर या गावांसह 10 ते 15 गावांमधील ग्रामस्थांना पुणे शहराचे अंतर 25 कि.मीने कमी होणार असून शेतमाल वाहतूक व विद्यार्थी वर्गास या पुलाचा फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wadner will build a bridge over the Kukdi river in Shivara