Video : अहमदनगर जिल्ह्यातील वाकी धरण ओव्हरफ्लो; ९७ क्यूसेकने निळवंडे धरणात सोडले पाणी

Waki dam overflows in Ahmednagar district due to heavy rains
Waki dam overflows in Ahmednagar district due to heavy rains

अकोले (अहमदनगर) : मुळा, भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील रतनवाडी येथे २४ तासात पावणे चार इंच तर घाटघरला चार इंच पाऊस पडला. भंडारदरा जलाशयात २४ तासात २३५ दशलक्ष घनफूट आवक झाली असून लेव्हल १५३.३० तर साठा ३३१९ असून वाकी जलाशय मुसळधार पावसात भरला आहे. वाकी धरणातून ओव्हरफ्लो झाल्याने धरणातून ९७ क्यूसेकने पाणी निळवंडे धरणात सोडण्यात आले आहे.
मुळा नदीवरील आबित, पिंपळगाव खांड लघु पाटबंधारे तलाव भरुन ओसांडून वाहू लागल्याने मुळा नदी वाहती झाली आहे. शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंपळगाव खांड लघु तलाव भरल्याने आता हे पाणी मुळा धरणाच्या दिशेने झेपावले आहे. तर भात खाचरात पाणी आल्याने शेतकरी गाळ तुडवणे व रोप लागवडीचे कामात व्यग्र आहेत. पाऊस संततधार पडत असल्याने दोन दिवसांपासून कळसूबाई, हरिश्‍चंद्रगड पट्टयात मान्सून पुन्हा सक्रीय झाला. 

कालपासून सह्याद्रीच्या डोंगररांगात पावसाच्या आगमनाने आज सकाळपर्यंत २४ तासात भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पडलेला एकूण पाऊस पुढीलप्रमाणे : भंडारदरा (७१/६१२, रतनवाडी ९१/८४८, घाटघर १०५/१२०७, पांजरे ६५/७५७, वाकी ५०/४८० मिलीमीटर दिवसभरही भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा तांडव जोरदार सुरुच होता. भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पडत असणार्‍या पावसामुळे या परिसरातील ओढे नाले आता जोमाने वाहू लागले आहे. कोलटेंम्भा, साम्रद,पांजरे येथील धबधबे सुरु झाले आहेत. 
भंडारदरा धरणाच्या पाणीसाठयातही चांगली वाढ होत आहे. सकाळपर्यंतच्या २४ तासात भंडारदरा धरणात २३५ दलघफू पाण्याची आवक झाली. सकाळी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा तीन हजार ३१९ दलघफू झाला होता. मुळा पाणलोट क्षेत्रातील हरिश्‍चंद्र परिसरात चांगला पाऊस सुरु आहे. मुळा नदीवरील पिंपळगाव खांड लघुपाटबंधारे तलाव भरल्याने नदी ओसंडून वाहू लागली आहे. ६०० दलघफू क्षमतेच्या, पिंपळगाव खांड तलाव भरल्यामुळे मुळा नदी वाहती झाली असून मुळेचे पाणी मुळा धरणाकडे झेपावले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com