esakal | मंदिरे उघडा; कीर्तन, प्रवचन करण्यास परवानगी द्या
sakal

बोलून बातमी शोधा

Warkari Manch Demand to Tehsildar to start temples in Nevasa taluka

मंदिरामध्ये प्रवचन कीर्तन करण्यासाठी परवानगी द्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वारकरी मंचच्या नेवासे तालुका शाखेच्या वतीने तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मंदिरे उघडा; कीर्तन, प्रवचन करण्यास परवानगी द्या

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : मंदिरामध्ये प्रवचन कीर्तन करण्यासाठी परवानगी द्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वारकरी मंचच्या नेवासे तालुका शाखेच्या वतीने तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
 

महाराष्ट्र राज्य वारकरी मंचचे वतीने देविदास महाराज आडभाई, भूषण महाराज खरवंडीकर, रामेश्वर महाराज राऊत, विजय महाराज पवार, शिवप्रसाद महाराज पंडित यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटलं आहे की, पंढरीच्या पांडुरंगाचे मंदिर खुले करण्यात यावे, राज्यातील सर्व मंदिरे दर्शनासाठी खुले करून द्यावीत, मंदिरामध्ये कीर्तन प्रवचने अनेक महिन्यांपासून बंद असून ती सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

निवेदनावर शिवप्रसाद महाराज पंडित, राम कर्जुले, राम महाराज खरवंडीकर, रामभाऊ महाराज तावरे, जनार्धन राशीनकर, किशोर महाराज चव्हाण, विलास महाराज खाटीक, नाथाभाऊ पंडित, शिवाजी पुंड, गणेश नागरे आदींच्या सहया आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर