
एमआयडीसीत सातत्याने स्थानिक तरूणांना नोकऱ्या देण्यासाठी कंपनी व्यवस्थापक जाणीवपुर्वक टाळत आहेत.
पारनेर (अहमदनगर) : सुपे एमआयडीसीत तसेच नव्याने उभी राहात असलेल्या म्हसणे फाटा एमआयडीसीत सातत्याने स्थानिक तरूणांना नोकऱ्या देण्यासाठी कंपनी व्यवस्थापक जाणीवपुर्वक टाळत आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी संपादीत झाल्या आहेत.
त्यांच्या मुलांना पात्रतेप्रमाणे व इतरही ठेकेदारीची कामे प्राधान्याने देणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नसल्याने स्थानिक तरूणांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. त्यामुळे स्थानिकांनी आंदोलन करूण आवाज उठविण्यास सुरूवात केली आहे. मात्र याचा एमआयडीसी वाढीवर परिणाम होऊ नये, यासाठी कंपनी व्यवस्थापन सरकारी अधिकारी व स्थानिक तरूण यांच्यात तोडगा काढणे गरजेचे आहे.
म्हसणे फाटा येथे नव्याने सुमारे 978 हेक्टर क्षेत्रावर जापणीज पार्क ऊभा राहात आहे. या एमआयडीसीमध्ये ज्या शेतक-यांच्या जमिनी गेल्या आहेत त्या शेतक-यांच्या मुलांनी सोमवारपासून (ता. 23) आम्हाला कंपनीत काम द्यावे या मागणीसाठी कॅरीअर माडीया कंपनीसमोर उपोषण सुरू केले आहे. तर पुढील आठवड्यात अनखी एका कंपनीत गेट बंद आंदोलन करण्याचा इशारा येथील स्थानिक तरूणांनी दिला आहे.
यामुळे नव्यानेच ऊभ्या राहात असलेल्या एमआयडीसीला ग्रहण लागू नये, यासाठी स्थानिकांना कंपनीव्यवस्थापणाने प्राधान्याने नौकऱ्या देऊन सामाऊन घेणे गरजेचे आहे. तसेच इतरही ठेकेदारीची छोटी मोठी कामे स्थानिक तरूणांना ज्यांच्या जमिनी संपादीत झाल्या आहेत. त्या शेतकऱ्यांच्या मुलांना देणे गरजेचे आहे.
स्थानिकांना कंपण्यांनी प्रत्येक कामात टाळले तर भविष्यात सातत्याने अशी आंदोलणे सुरू होतील. कंपण्यांना त्रास झाला तर नव्याने येथे येणा-या कंपण्यास तयार होणार नाहीत. अशा प्रकारे सातत्याने कंपण्यांना त्रास झाला व आंदोलणे झाली तर भविष्यात येथे येणा-या नामवंत कंपण्या तयार होणार नाहीत. व त्यामुळे एमआयडीसीचा विकास खुंटला जाईल अशी भिती कंपणीव्यावस्थापक तसेच सरकारी अधिकारी येथील तरूणांना दाखवत आहेत.
जर येथे सुरू होत असलेल्या एमआयडीसीला आमच्या जमिनी देऊनही आम्हालाच या कंपण्यांमध्ये कामच मिळणार नसेल तर येथे एमआयडीसी सुरू होऊन व आमच्या जमिनी देऊन काय फायदा व जर काम मिळत नसेत तर आमएमआयडीसी नाही झाली तरी चालेल अशी भावना अता तरूणांमध्ये निर्माण होत आहे.त्या मुळे भविष्यात याचा एमआयडीसीच्या विकासावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आमच्या जमिनी गेल्या आहेत मात्र येथे पुणे जिल्ह्यातील लोकांनाच कंपण्या ठेकेदारीची कामे देत आहेत. इतकेच नव्हे तर कंपणीतही ठेकेदारीवरच कामाला घेतले जाते. त्यामुळे अतीशय कमी पगार मिळतो. शिवाय अनेक कंपण्या तालुक्यातील कामगारांपेक्षा तालुक्याबाहेरील कामागरांना कामावर प्राध्यन्याने कामावर घेतात.-अविनाश रासकर व संतोष गाडीलकर यांनी सांगितले.
संपादन : अशोक मुरुमकर