
संगमनेर : कामाला गेल्यावर पिण्यासाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे पाणी भरण्यासाठी रोजंदारी बुडून घरी थांबावे लागते. नुकताच पिण्याच्या पाण्याचा टँकर टाकीत खाली झाला आहे. यामुळे पाणी भरण्यासाठी महिलांनी भर उन्हात गर्दी केली. ‘साहेब तुम्हीच सांगा, आमचा कायमचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तरी कधी मिटणार? अशा व्यथा कर्जुले पठार (ता. संगमनेर) हौसाबाई पडवळ, स्वप्नाली गोडसे या महिलांनी मांडला आहे.