दोन-दोन माणसं वावडीबरोबर २० फूटापर्यंत हवेत उडायची? ‘या’ गावात १५ दिवस चालायचा महोत्सव... 

vavadi
vavadi

अहमदनगर : कोठे मकर संक्रांतीला... कोठे दिवाळीला तर कोठे नागपंचमीनिमित्त चिमुकले पतंग उडवतात. शहरात ज्याप्रमाणे मुलं पतंग उडवत त्याचप्रमाणे मोठ्या उत्साहाने ग्रामीण भागात मोठी वावडी करून उडवण्याचा उत्सव साजरा केला जात. कालांतराने हा उत्सव मागे पडत गेला. आता काही ठिकाणी वावडी उडवतात पण वावड्यांचा आकार लहान झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्‍यातील वांगी, शेटफळ येथे वावडी उडवण्याची परंपरा होती. मात्र काही कारणाने ती सध्या बंद झाली आहे. गावात अनेक नागरिक एकत्र येऊन मोठ्या आकाराची वावडी करून उडवत होते. येथे ते फुटाची वावडी केली जात होती. त्याला उडवण्यासाठी गावकरी एकत्र येत होते. वावडी बनवण्यासाठी लागणारे बांबू, कागद, दोरा आदी साहित्याची जुळवाजुळव तरुणाई करत होती. चिमुकले ज्याप्रमाणे पतंग काटाकाटी खेळत त्याप्रमाणे वावडीची सुद्धा काटाकाटी गेली जात. 

करमाळा तालुक्‍यात बिटरगाव (श्री) येथे नागपंचमीला पतंग उडवले जातात. दरवर्षी पावसाळ्यात येणारा हा उत्सव पण नेमका त्याच वेळी पाऊस असतो. आणि त्याला उडण्यासाठी वारा लागता पण, वारा नसेल आणि पाऊस असेल तर उत्सवावर पाणी पडे. पंचमी दिवशी शाळेला एक दिवस सुटी मिळते. पण, इतर दिवशी म्हणजे साधारण महिनाभर तर चिमुकले पतंग उडवतात. शाळेतून आले की मुलं पतंग घेऊन शेतात जात. पण यावर्षी कोरोनामुळे हा उत्सव चिमुकल्यांना साजरा करता आला नाही. वावडी उडवणे तर आता जवळजवळ हद्दपारच झाले आहे. काही ठिकाणी उडवली जाते, पण तीही यावर्षी उडली नाही. 

गुंडाळलेला कडक दोऱ्याचा मांजा, फर्रर्र करीत उडणारा कागदी किंवा प्लास्टिकचा पतंग. वावडीलासुद्धा फर्रर्र आवाज यावा म्हणून झिरमाळ्या लावल्या जात. वावडी, पतंग सर्वात जास्त उंच उडावेत म्हणून तरुणाई, चिमुकले प्रयत्न करत. या फक्त आता आठवणी राहिल्या आहेत. 

काहीजण बिगर शेपटाचा पतंग उडवत तर गोत खाऊ नये म्हणून काहीजण त्याला शेपूट (दोरी) बांधतात. वाऱ्यात बिगरशेपटीचे पतंग अन्‌ वावड्या गरगर फिरायच्या. कधी कधी तर मोठ्ठाल्या वावडीच्या लांब शेपटीच्या टोकाला दगडही बांधावा लागे. तेव्हा कुठे ती स्थिर राहून उडायची. गोते खाणाऱ्या पतंगांना व वावड्यांना शेपटासोबत गवत लटकवल्याशिवाय ते चांगले उडत नसायचे. 

करमाळा तालुक्‍यातील शेटफळ नागोबाचे येथील प्रशांत नाईकनवरे म्हणाले, नागपंचमीच्या दिवशी पतंगाबरोबरच मोठी वावडी करण्याची व ती उडवण्याची परंपरा आमच्या गावांमध्ये होती. साधारण पूर्वीच्या लाकडी बांधकामातील एका खानाएवढी जागा ही वावडी व्यापत असे. म्हणजे साधारण ते फूट उंच व आठ ते फूट रुंद या आकाराची वावडी असायची. गावातील तरुण मंडळी सार्वजनिकपणे वावडी तयार करत आणि गावाबाहेरील मैदानामध्ये वारा सुटल्यानंतर उडवायचे. यामध्ये गावातील सर्व तरुणांचा सहभाग असायचा. दिवसभर वावडी उडवण्याचा कार्यक्रम ठरलेला असायचा. 

वावडी तयार करण्यासाठी रंगीबेरंगी कागद लागत. खास बनवणारी माणसं होती. पुढे कालांतराने काळ बदलला आणि वावडी उडवण्याची परंपराही नामशेष होत गेली. आता काहीजण वावड्या बनवतात पण त्याचा आकार पूर्वीच्या तुलनेत खूप कमी आहे. आता वावडी उडवण्यासाठी वारेही येत नाही. पावसाचा लहरीपणा यामुळे पाऊस वेळेवर येत नाही. पाऊस आला तर वावडी उडवता येत नाही. पावसात वावडी फाटू नये म्हणून काहीजण प्लास्टिकचीही वावडी करत, आता त्याचे प्रमाण अल्प आहे.

असा चालयाचा महोत्सव...

वावडी बनवणारे गजेंद्र पोळ म्हणाले, पूर्वी नागपंचमी जवळ आली की, आठ ते १० दिवस अगोदर गावातील तरुणांची वावडी बनवण्याची लगबग सुरु व्हायची. त्यासाठी बांबू, कागद, कापड, डिंक, गम, सुतळी, आकारानुसार दोरो, तार, खिळे याची जुळवाजुळव केली जाईची. यासाठी रात्र- रात्र जागून तीन- चार दिवसात वावडी बनवली जायची. एक दिवस चिटकून ठेऊन त्यावर वजन ठेवले जायचे. वरची कामट लवचीक ठेवली जाईची. त्यामुळे त्याला अर्धगोलाकार केले जाईचे. त्यानंतर दोरा बांधण्यासाठी मंगळसुत्र तयार केले जायचे. त्यानंतर मोकळ्या जागेत वावडी उडवायला जायचे. त्यानंतर ग्रुपने वावडी उडवले जायची. गावात किमान चार- पाच ग्रुप असायचे. पुन्हा ती वावडी उडवण्याची स्पर्धा असायची. 

दोन-दोन माणसं वर उडायची...

वांगी या गावात हा महोत्सव खूप मोठ्याप्रमाणात चालत होता. येथे दोन वावड्या मोठ्या असायच्या. या म्हणजे एक वरची आळी आणि दुसरी खालची आळी. याध्ये चुरस चालत होती. ती म्हणजे कोणाची वावडी मोठी होतेय आणि कोणाची सर्वात जास्त उंच जात आहे ती. वावडी जशी- जशी वर जायची तसतशी वावडीच्या शेपटीला धरुन दोन धरुन दोन मणसं १५- २० फूट वर जात होती. मात्र एक अनुचित प्रकार घडला आणि हा माहोत्सव बंद होत गेला. 

संपादन : सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com