
संगमनेर :वारकरी संप्रदायाच्या विचारांचे वाहक माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वात तालुक्यातील सुमारे ५०० युवक-युवतींनी ‘आम्ही संगमनेरी विठुरायाचे वारकरी’ या ब्रीदवाक्याखाली पंढरपूर आषाढी वारीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. दिंडीच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य तपासणी, स्वच्छता, जेवण वाढवणे, सेवा कार्य अशा उपक्रमांमध्ये दोन दिवस सेवाभावाने भाग घेतला.