भाळवणीत आमदार लंके प्रतिष्ठानच्यावतीने सुसज्ज कोविड सेंटर; 1 हजार रुग्णांवर होणार उपचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A well equipped covid center has been set up on behalf of MLA Lanka Pratishthan in Bhalwani.jpg

या कोविड सेंटरमध्ये रूग्णांना मोफत औषधे, सकस आहार तसेच त्यांच्यासाठी करमणुकीच्या साधनांचीही सोय करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार निलेश लंके यांनी दिली.

भाळवणीत आमदार लंके प्रतिष्ठानच्यावतीने सुसज्ज कोविड सेंटर; 1 हजार रुग्णांवर होणार उपचार

पारनेर (अहमदनगर) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्यावतीने आता भाळवणी येथे 100 ऑक्सिजन बेडसह एक हजार बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या सेंटरचे उदघाटन बुधवारी (ता. 14 ) महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभदिनी होणार आहे. या कोविड सेंटरमध्ये रूग्णांना मोफत औषधे, सकस आहार तसेच त्यांच्यासाठी करमणुकीच्या साधनांचीही सोय करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार निलेश लंके यांनी दिली.

भाळवणी येथील डॉ. संतोष भुजबळ व प्रा. बबनराव भुजबळ यांच्या नागेश्वर मंगल कार्यालयात हे कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. गतवर्षी राष्ट्रवादी काँग्रेस व आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने कर्जुले हर्या येथेही एक हजार बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. त्या ठिकाणी सुमारे तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ चालविलेल्या कोरोना सेंटर मध्येही सुमारे साडेतीन हजारावर कोविड रूग्णांनी उपचार घेतले व ते तंदुरूस्थ झाले. त्या ठिकाणी त्या वेळीही रूग्णांना मोफत औषोधोपचार व जेवणाची सोय करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर त्या रूग्णांसाठी वाफेचे मशीन किंवा तत्सम साहित्यही मोफत पुरविण्यात आले होते. येथे रूग्णांसाठी नियमित योगा ही करून घेतला जात होता. 
 
या वेळी भाळवणी येथे सध्या एक हजार बेडचे कोरोना सेंटर सुरू केले जाणार आहे. सध्या येथे 100 ऑक्सिजन बेडचीही सोय केली आहे. याही ठिकाणी रूग्णांना मोफत औषोधोपचार केले जाणार आहेत. तसेच त्यांना मोफत सकस आहार देण्यात येणार आहे. रूग्णांसाठी योगा, करमणुकीचे साधणे, प्रवचन कीर्तण या सारख्या बाबींचीही सोय केली जाणार आहे.

या सेंटरच्या उदघाटनापुर्वी नियोजनाची बैठक सोमवारी झाली. त्या वेळी आमदार निलेश लंके, प्रातांधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, तालुका आरोग्यधिकारी डॉ.प्रकाश लाळगे, पक्षाचे तालका अध्यक्ष बाबाजी तरटे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापू शिर्के, कारभारी पोटघन, विजय औटी, बाळासाहेब खिलारी, सोमनाथ वरखडे आदी सह डॉ.लोंढे, डॉ. डोईफोडे उपस्थित होते.

भाळवणी येथील कोरोना सेंटरच्या उदघाट्ना पुर्वीच देणगीदारांकडून रूग्णांसाठी 50 हजार अंडे मोफत देण्यात आली आहेत. तसेच आगामी 15 दिवस कोरोना सेंटरमधील रूग्णांसाठी भोजन देण्या-या थोर देणगीदारांनी आपली आगाऊ नोंदणी करून घेतली आहे. 

भाळवणी येथील कोरोना सेंटरवर जनतेच्या सोयीसाठी कोरोना प्रतिबंधक लससुद्धा देण्यात येणार आहे. या लसीकरणाचा शुभारंभ ही उदघाटनाच्या दिवशीच करण्यात येणार असून पहिली लस स्वत: मीच घेऊन या लसीकरणाचा शभारंभ करणार आहे. 
- निलेश लंके, आमदार.

Web Title: Well Equipped Covid Center Has Been Set Behalf Mla Lanka Pratishthan Bhalwani

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..