Wet N Joy Water Park : थंडाव्याची अनुभूती व जलक्रीडेचा आनंद लुटण्यासाठी वेट एन जाॅय वाॅटर पार्कमध्ये गर्दी

जलक्रीडेचा आनंद; पूर्वाचलातील कलाकारांचे नृत्य अन् कसरतीचे प्रयोग आकर्षण
wet n joy water park and amusement park summer heat wave shirdi ahmednagar
wet n joy water park and amusement park summer heat wave shirdi ahmednagarsakal
Updated on

शिर्डी : उष्णतेच्या लाटेत सध्या जनजीवन हैराण होत असताना, थंडाव्याची अनुभूती व जलक्रीडेचा आनंद लुटण्यासाठी येथील वेट एन जाॅय वाॅटर पार्कात अबालवृध्द साईभक्तांची मोठी गर्दी होत आहे.

साईदर्शनानंतर येथे सलग पाच ते सात तास जलक्रीडेचा आनंद लुटता येतो. पूर्वाचलातील कलाकारांचे मोहक ॲक्रोबेट नृत्य व श्वास रोखून धरायला लावणारे कसरतींचे प्रयोग हे या वाॅटर पार्कला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने यंदाचे आगळे वेगळे आकर्षण ठरत आहे.

संगमनेर येथील मालपाणी परिवाराने अठरा वर्षापूर्वी येथे या वाॅटर पार्कची उभारणी केली. हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे. जलक्रीडेची आवड असणाऱ्या देश-विदेशातील साईभक्तांच्या दृष्टीने हा आनंद देणारा एकमेव प्रकल्प ठरला.

सध्या दररोज अडीच ते तीन हजार जलक्रीडाप्रेमी या प्रकल्पास भेट देऊन पाण्यासोबत खेळण्याचा व तब्बल बावीस राईड करण्याचा आनंद लुटतात. आबालवृद्धांचे आकर्षण ठरणारे प्ले स्टेशन, लेझी रिव्हर, समुद्राच्या लाटांवर स्वार होण्याचा आनंद देणारा भव्य वेव्ह पूल, रेन डान्स, मल्टिलेन राईड, पेंड्यूलम राईड, लहान मुलांसाठी स्वतंत्र कीड्स पूल येथील प्रमुख आकर्षण आहे.

wet n joy water park and amusement park summer heat wave shirdi ahmednagar
Summer : उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कंट्रोल करायचीय? हे मसाले टाळा

आसामसह पूर्वाचलातील छोट्या राज्यातून सहा कलाकारांचे पथक येथे आले आहे. ते दिवसातून तीन ते चार वेळा चित्तथरारक कसरीचे प्रयोग सादर करतात. त्यांचे ॲक्रोबेट नृत्य पर्यटकांचे मनमोहून टाकते. त्यांच्या या सादरीकरण्याच्या व्हीडीओ क्लिप सध्या सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत.

याबाबत ‘सकाळ’शी बोलताना व्यवस्थापक डाॅ. संतोष खेडलेकर म्हणाले, साईदर्शनानंतर शिर्डीत मुक्काम करावा, असे अनेक भाविकांना वाटते. मात्र येथे पहाण्यासारखे फारसे काही नाही. वाॅटर पार्कमुळे भाविकांची ही गैरसोय दूर झाली. येथे त्यांचे पाच ते सात तास मजेत जातात. येथील सर्व राईड सुरक्षीत व आंतराष्ट्रीय मानांकनानुसार पाण्याच्या शुध्दतेसह अन्य सर्व खबरदारी घेतली जाते. त्यामुळे पर्यटक व साईभक्तांची पहिली पसंती या वाॅटर पार्कला असते.

wet n joy water park and amusement park summer heat wave shirdi ahmednagar
Ahmednagar : विद्यार्थ्यांची प्रगती पाहून शिक्षकही अचंबित; आदिवासी पाड्यावरील प्राथमिक शाळा अधोरेखित

शिर्डीत आलेल्या भाविकांनी येथे एक दोन मुक्काम केले तर अर्थकारणाला चालना मिळू शकते. वेट एन जॉय वॉटर पार्कमुळे बरेच साईभक्त शिर्डीत मुक्कामाला थांबतात. त्यातून रिक्षाचालकांसह अनेकांना रोजगार मिळतो. यंदा आम्ही अहमदनगर जिल्ह्यासह शेजारच्या नाशिक व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी प्रत्येक तिकिटावर १५ टक्के दिली. त्यास चांगला प्रतिसाद मिळतो आहे, त्यासाठी आधारकार्ड असणे गरजेचे आहे.

- जय मालपाणी, कार्यकारी विश्वस्त वेट एन जाॅय वाॅटर पार्क, शिर्डी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com