‘या’ गाड्या हॉर्न वाजवून पोलिसांसमोरुन भरधाव वेगाने जातायेत

गौरव साळुंके
Sunday, 9 August 2020

लॉकडाऊन शिथिलतेनंतर जिल्हा प्रशासनाकडुन वाहतुक नियमांच्या सुचना वारंवार दिल्या जात असल्या तरी येथील प्रमुख चौकात वाहतुक नियमांचे सर्रास उल्लघंन होत आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : लॉकडाऊन शिथिलतेनंतर जिल्हा प्रशासनाकडुन वाहतुक नियमांच्या सुचना वारंवार दिल्या जात असल्या तरी येथील प्रमुख चौकात वाहतुक नियमांचे सर्रास उल्लघंन होत आहे.

शहरातील शिवाजी चौक, गांधी चौक, नार्दन ब्रॅच, गिरमे चौक, सय्यदबाबा चौक अशा प्रमुख चौक परिसरात दिवसभर वाहतुकीची वर्दळ असते. अनेक दुचाकीस्वार विनामास्क टिब्बलसीट जीव धोक्यात घालुन भरधाव वेगात प्रवास करतात.

वाहतुक नियमांचे उल्लघंन करण्यात प्रामुख्याने तरुणांई आघाडीवर असते. तसेच विना क्रमांकाची वाहने कर्णकर्कश हॉर्नच्या दुचाक्या वाहतुक पोलिसांसमोरुन भरधाव वेगात निघुन जातात. दिवसेंदिवस शहरातील विविध चौकासह प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढत आहे. कोरोनाच्या कहरात आजही अनेकजण शहरात विनामास्क दुचाकीस्वार आढळुन येतात. तर अनेक चौकात टिबलसीट दुचाक्या फिरतात.

टिबलसीटमुळे सोशल डिस्टसिंगच्या नियमांसह वाहतुक नियम मोडली जात आहे. टिबलसीट, विनामास्क वाहन चालकांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुन द्विवेदी यांनी नुकतेच दिले. परंतू शहर पोलिस व वाहतुक पोलिस याबाबत अद्याप अनभिज्ञ्य आहे.

शहरातील अनेक चौकात वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस हजर असतात. परंतू अपुरया पोलिस बळामुळे तुरळक वाहनांवर कारवाई केली जाते. त्यामुळे वाहतुकीचे नियमांचे सर्रास उल्लघंन होते. अनेकजण पोलिसांसमोर सिंग्नलचे नियम पायदळी तुडवतात. काही दुचाकीस्वार सिंग्नल सुटण्यापुर्वीच भरधाव वेगात निघुन जातात. शिवाजी चौकातील वाहतुक यंत्रणा अनेकदा विस्कळीत होते.

शहरात सध्या कर्णकर्कश हॉर्नसह फटाक्या सारख्या आवाजाच्या सायलनसरच्या दुचाक्या मोठया प्रमाणात वाढल्या आहे. कर्णकर्कश हॉर्न व फटाक्या सारख्या आवाजाच्या सायलनसरच्या दुचाकी चालक भरधाव वेगात विविध रस्त्यावरुन भरधाव वेगात फिरतात. वाहतुक पोलिस यंत्रणेकडुन सदर वाहनावर कुठलीही कारवाई होत नसल्याने त्याचे प्रमाण वाढले आहे. कर्णकर्कश हॉर्नसह फटाक्या सारख्या सायलनसरमुळे शहरातील ध्वनीप्रदुषण दिवसेंदिवस वाढत आहे.
 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who did not follow the traffic rules in front of the police in Shrirampur taluka