Breaking : शिवसेनेचे नगरचे संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावगर यांनी पारनेरमध्ये जाऊन औंटीची का घेतली भेट?

सनी सोनावळे
Wednesday, 15 July 2020

शिवसेनेच्या पाच नगरसेवकांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशानंतर राज्यपातळीवर त्याचे पडसाद उमटले होते. त्या नगरसेवकांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेशही केला. मात्र अजुनही या घटनेवर पडदा पडला नाही. आज शिवसेनेचे नगरचे संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावगर यांनी पारनेरमध्ये येऊन विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांची भेट घेतली. यामध्ये नेमकी काय चर्चा झाली हे गोपनीय ठेवण्यात आले आहे. औटी यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला आहे.

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : शिवसेनेच्या पाच नगरसेवकांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशानंतर राज्यपातळीवर त्याचे पडसाद उमटले होते. त्या नगरसेवकांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेशही केला. मात्र अजुनही या घटनेवर पडदा पडला नाही. आज शिवसेनेचे नगरचे संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावगर यांनी पारनेरमध्ये येऊन विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांची भेट घेतली. यामध्ये नेमकी काय चर्चा झाली हे गोपनीय ठेवण्यात आले आहे. औटी यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या भेटीनंतर नगरसेवक व औटी यांच्यात समन्वय ठेवण्यासाठी कोरेगावगर यांना मातोश्रीवरूनच सांगण्यात आले होते. मात्र नगरसेवकांना कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मुंबईवरून आल्यामुळे होम क्वारंटाईन केले होते. त्यामुळे कोरेगावकर यांचा दौरा लांबला असल्याची चर्चा आहे. आज या भेटीमध्ये जिल्हा परिषदेचे कृषी व बांधकाम सभापती काशिनाथ दाते, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, तालुकाप्रमुख विकास रोहकले, पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, शहरप्रमुख निलेश खोडदे, युवा सेना प्रमुख नितीन शेळके, विजय डोळ उपस्थित होते.
कोरेगावगर यांच्या सत्कारानंतर बंद खोलीत औटी व कोरेगावगर यांची दोन तास चर्चा झाली आहे. यातील माहीती मागील झालेल्या घटनेवरून व त्यानंतर झालेल्या घडामोडींमुळे ही चर्चा गोपीनीय ठेवण्यात आली असल्याचे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात येत आहे. यानंतर कोरेगावगर यांनी पारनेर येथील शासकीय विश्रामगृहावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके व पाच नगरसेवकांची भेट घेतली. आगामी येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीमधील घटक पक्ष एकत्र लढणार का? लंके व औटी जुळुन घेणार का? ही चर्चा सध्या तालुक्यात रंगत आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why did Shivsena Nagar liaison chief Bhau Koregaonagar go to Parner and meet Auty