सुनंदा पवार का आहेत जामखेडकरांवर नाराज, कर्जतवर खुश

वसंत सानप
Wednesday, 23 December 2020

स्वच्छ सर्वेक्षणांमधून मध्ये जामखेड शहर राज्यातील पहिल्या पाच शहरांमध्ये यावे याकरिता आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून जामखेड शहराचे वैभव ठरलेली विंचरणा नदी हरवलेलं रूप पूर्वपदावर यावं

जामखेड :  कर्जत-जामखेडमधील जनतेने रोहित पवार यांना निवडून दिल्यानंतर त्यांनी कामाचा धडाका लावला आहे. प्रत्येक गोष्टींत ते जातीने लक्ष घालतात. मातुश्री सुनंदाताई यांनीही वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. आमदारांचे वडील राजेंद्र पवार यांनीही शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी बैठका, प्रशिक्षण वर्ग, अभ्यासदौरा असे विविध उपक्रम राबवले आहेत.

दोन्ही तालुक्यात त्यांनी माझं शहर, सुंदर शहर ही संकल्पना राबवली आहे. त्यास कर्जतकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. सर्व पवार कुटुंब या अभियानात स्वतः श्रमदान करते. मात्र, जामखेड शहरातून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्याबद्दल श्रीमती पवार यांनी तशी जाहीर नाराजी व्यक्त केली.

जामखेडपेक्षा कर्जतचा स्वच्छता सर्वेक्षणातील सहभाग उल्लेखनीय आहे. जामखेडमध्ये तसा चांगला प्रतिसाद मिळत नाही. माझं शहर स्वच्छ, सुंदर असावं, अशी जाणीव व्हायला हवी, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा पवार यांनी व्यक्त केली.

जामखेडमधील शासकीय इमारतींना रंग देण्यासाठी, शहरातील भिंती "बोलक्‍या' करण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून 30 लाखांचा रंग पालिकेकडे सुपूर्द करण्यात आला. त्या वेळी पवार बोलत होत्या. आमदार पवार यांच्या माध्यमातून दिव्यांगास तीन चाकी सायकल देण्यात आली.

पवार म्हणाल्या, ""शासकीय कार्यालयांची पाहणी केली असता, सर्व इमारतींना एकच रंग असावा, असा प्रस्ताव पुढे आला. पालिकेनेही तशी मागणी आमदार रोहित यांच्याकडे केली. त्यानुसार रोहित यांनी एशियन पेंन्टस कंपनीशी बोलून कर्जत-जामखेडसाठी रंग उपलब्ध करून दिला. श्रमदानातून नागरिकांनीही योगदान द्यावे.'' 

कर्जतपाठोपाठ राशीन, सिद्धटेक ही गावे स्वच्छता अभियानात छान काम करीत आहेत. मात्र, जामखेडमध्ये उदासीनता वाटते. सर्वांनी एकजुटीने सातत्य ठेवून सहभाग नोंदविला तर निश्‍चितपणे आपले शहर स्वच्छ आणि सुंदर होईल. स्पर्धेत आपला पहिल्या 5 शहरांमध्ये समावेश होईल," असा विश्वास सुनंदाताई पवार यांनी व्यक्त केला. 

स्वच्छता सर्वेक्षणात अग्रभागी येण्यासाठीचा सुनंदाताई नी दिला हा मंत्र :

  • आपलं शहर स्वच्छ व सुंदर असाव ही मानसिकता प्रत्येक नागरिकांची असावी आणि त्या दिशेने पावलं उचलावीत. 
  • विविध संघटना,सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांनी एकसंघ होऊन नियमित श्रमदानासाठी पुढे यावे. 
  • एन.सी.सी. व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिशन म्हणून या कामात स्वतःला झोकून द्यावे. 
  •  कार्यालयिन प्रमुखांनी स्वतःच्या कार्यालयाचे व्यावस्थापन करताना कार्यालयात कामकाजासाठी येणाऱ्या व धुम्रपान करणाऱ्यांकरिता थुंकण्यास मनाई करणारे,तसेच थुंकण्याची व्यवस्था असणारे *अँरो* दाखवावेत.बेसिनची व्यवस्था ठेवावी. तसेच सार्वजनिक शौचालय-मुतारीची व्यवस्था असावी. 

आमदार रोहित पवारांची अशी मिळाली मदत 

स्वच्छ सर्वेक्षणांमधून मध्ये जामखेड शहर राज्यातील पहिल्या पाच शहरांमध्ये यावे याकरिता आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून जामखेड शहराचे वैभव ठरलेली विंचरणा नदी हरवलेलं रूप पूर्वपदावर यावं आणि ही नदी वाहती व्हावी याकरिता काम सुरू आहे हे काम अंतिम टप्प्यात आहे. 

आमदार रोहित पवारांकडून ही देखील मिळणार मदत

सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना बसण्याकरिता 70 बाक. 
सार्वजनिक ठिकाणी कचरा वन्य साहित्य टाकण्यासाठी 62 डजबिन 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why Sunanda Pawar is angry with Jamkhedkar