
अकोले : विधवा विवाहाचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. नुकतेच अकोल्यातील अतुल आरोटे यांनी पतीचे निधन झालेल्या सुलक्षणा भोर यांच्याशी विवाह केला. विवाह करताना अतुल यांनी सुलक्षणा यांच्या दोन्ही मुलींचा स्वीकार केला व सुलक्षणा यांनीही अतुल यांच्या मुलाचा स्वीकार करून एक एक नवा आदर्श घालून दिला. दुःखातून बाहेर येत सुलक्षणा यांनी नव्याने जीवनाची सुरुवात केली.