पात्र असूनही पोलिस भरतीत अपात्र ठरला; न्याय मिळेल का?

पात्र असूनही पोलिस भरतीत ठरला अपात्र; डावलल्याची भावना
अहमदनगर : अभिजितला मिळेल का न्याय
अहमदनगर : अभिजितला मिळेल का न्यायsakal

नेवासे : संघटनेने वेळेत क्रीडा विभागाला कागदपत्रे सादर न केल्याने पोलिस भरती परीक्षेत पास होऊन देखील अपात्र ठरलेल्या नेवासे येथील व्हॉलीबॉल खेळाडू अभिजित सुरेश हुसळे याने झालेल्या अन्यायामुळे तहसीदारांकडे आत्मदहनाची परवानगी मागीतली आहे. अभिजितला न्याय मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अभिजित हा विद्रोही साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष हुसाळे यांचा नातू आहेत. त्याने नेवासे तहसीलदारांना निवेदन देऊन आत्मदहनाची परवानगी मागितल्याने क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली. महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसीएशनमार्फत नागपूर येथे घेण्यात आलेल्या ज्यूनिअर आंतर विभागीय स्पर्धेत पुणे विभागामार्फत त्याने भाग घेतला होता. संघाने विजेतेपद पटकाविल्याने संघटनेचे अध्यक्ष विजय डांगरे व सचिव बाळासाहेब सूर्यवंशी यांचे स्वाक्षरीसह त्याला गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले होते. त्या प्रमाणपत्रा आधारे अभिजितने खेळाडूंसाठी राखीव कोट्यातून पाच आॅक्टोबर २०२१ रोजी पुणे शहर पोलिस शिपाई भरती परीक्षा दिली. त्यात तो पास झाला.

अहमदनगर : अभिजितला मिळेल का न्याय
महावितरणमध्ये सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना लॉटरी पध्दतीने काम

दरम्यान, पुणे विभागीय क्रीडा कार्यालयाच्या उपसंचालकांनी १३ ऑक्टोबर २०२१ रोजी असोसिएशनचे सचिव बाळासाहेब सूर्यवंशी यांच्याकडे स्पर्धेचा अहवाल व संबंधित कागदपत्राची मागणी केली. अभिजित यानेही सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला. मात्र त्याला त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. ३१ ऑक्टोबरपर्यंत कुठलाही अहवाल त्यांनी क्रीडा उपसंचालकांना पाठविला नाही. त्यामुळे त्यास पुणे सहायक पोलिस आयुक्तांनी अपात्र ठरविले. अभिजितने मला न्याय मिळत नसेल, तर आत्मदहनाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नेवाशाच्या तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना घातले साकडे

आपल्याला न्याय मिळावा, यासाठी अभिजितने मुख्यमंत्री व क्रीडामंत्र्यांकडे ई-मेलद्वारे दाद मागितली. दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही सदर ई-मेल पुढील कार्यवाहीसाठी क्रीडा विभागास पाठविण्यात आल्याचे कळविले आहे.

"मला हेतुपुरस्सर व्हॉलीबॉल असोसिएशन व सचिव सूर्यवंशी यांनी पोलिस भरतीपासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे माझे संतुलन बिघडले आहे. मला न्याय मिळावा."

- अभिजित हुसळे, राज्यस्तरीय व्हॉलीबॉल खेळाडू, नेवासे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com