खरीप हंगामात खतांच्या काळाबाजाराला यामुळे बसणार लगाम

 This will curb the black market of fertilizers during the kharif season
This will curb the black market of fertilizers during the kharif season
Updated on: 

 नगर ः खरिपाच्या पेराच्या वेळी शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार 15 भरारी पथके तैनात केले आहे. त्यामुळे बी-बियाणे, खंताच्या काळाबाजाराला आळा बसणार आहे. 

मागील दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेत व्यस्त आहे. दरम्यान याच काळात सतर्कता बाळगून जिल्हा प्रशासनाने खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. हवामान खात्याने यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या भाकितानुसार समाधानकारक पाऊस झाल्यास जिल्ह्यात पावणे सहा लाख हेक्‍टर क्षेत्रावर खरिपाचा पेरा होण्याचा प्राथमिक अंदाज आहे.

शेतशिवारात शेतकरी खरीप हंगामातील पूर्व मशागतीची कामे करण्यात व्यस्त आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कृषी विभाग देखील खरिपासाठी सतर्क झाला आहे.

खरिपाच्या विविध वाणांचे 64 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. तब्बल तीन लाख टन खतांची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यापैकी सव्वा दोन लाख खतांचे आवंतन प्राप्त झाले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय एक पथक स्थापन करण्यात आले. त्याचप्रमाणे 14 तालुक्‍यात तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येकी एक पथक स्थापन करण्यात आले आहे. 

अन्यथा फौजदारी गुन्हे 
बी-बियाणे, खतांच्या बाबतीत गैरप्रकार आढळल्यास तालुकास्तरीय भरारी पथक संबंधित अहवाल जिल्हास्तरीय पथकाकडे पाठविणार आहे. यात परवाना रद्द करण्याबरोबरच फौजदारी गुन्हे देखील दाखल होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

‘Mula Dam Water,
Balasaheb Thorat and Sujay Vikhe Share the Same Platform
Bhingar Cantonment Development Nilesh Lanke Directs Action on Fort Beautification Lake Cleaning Hospital and Teachers
Bhandardara Dam Centenary Tourism Plan E Tender For Key Sites And Krishnavanti Rest House On 49 Year Lease Announced
Marathi News Esakal
www.esakal.com