
-हरिभाऊ दिघे
तळेगाव दिघे : घरची परिस्थिती हलाखीची असूनही वडझरी बुद्रुक (ता. संगमनेर) येथील भूमिपुत्र सचिन संपत वेताळ या युवकाने जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदापर्यंत मजल मारली. सचिन वेताळ यांनी जिद्दीने यशाची पताका फडकविली असून, अधिकारी होण्याचे आई-वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. त्यांचे हे यश युवकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.