esakal | औटी मान गए...याचिका मागे घेतल्याने कुकडीचे आवर्तन येणार
sakal

बोलून बातमी शोधा

कुकडी

औटी मान गए... याचिका काढल्याने कुकडीचे आवर्तन सुटणार

sakal_logo
By
नीलेश दिवटे

कर्जत : कर्जत : मुंबई उच्च न्यायालयात कुकडी लाभक्षेत्रातील पिंपळगाव जोगा धरणातील पाणी शेती आवर्तनकरिता सोडण्यात येऊ नये, याकरिता प्रशांत औटी यांनी दाखल केलेली याचिका आज मागे घेतली. त्यामुळे आता कुकडी आवर्तन सुटण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. मात्र, पाण्याच्या समान हक्कासाठी सर्वांना एकत्रित लढावे लागेल, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. कैलास शेवाळे यांनी केले आहे. (Withdrawal of the petition in the court will end the cycle of kukadi)

त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ता 9 एप्रिल रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. त्यामध्ये उन्हाळी आवर्तन सोडण्याबाबत निर्णय झालेला होता. परंतु दरम्यानच्या काळामध्ये प्रशांत औटी यांनी उच्च न्यायालयात (मुंबई) याचिका दाखल करून आवर्तन सोडण्यास स्थगिती मिळवली होती. तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ द्यायचा नाही या हेतूने मी तसेच श्रीगोंदा येथील राजेंद्र म्हस्के, बाळासाहेब नाहाटा आम्ही तिघांनी एकत्र येत अॅड. राजेंद्र अनभुले यांच्यामार्फत इंटर्वेंशन अॅपलिकेशन दाखल केले होते.

सदर अर्जावर ता.12मे रोजी सुनावणी होऊन सरकारी अभियोक्ता श्री. साखरे यांनी कोर्टाला मुदत मागितल्यावर सदर याचिकेची सुनावणी आज (ता. 17 मे)ठेवली होती. मात्र आज सदरील सुनावणीदरम्यान मुख्य याचिकाकर्ते प्रशांत औटी यांनी सदरची याचिका मागे घेतली. आमदार रोहित पवार यांनी त्यांचे मन वळवले. त्यानंतर ते राजी झाले. यामुळे आता कुकडी धरणातील पाणी शेतीकरिता सोडण्याचा मार्ग सोपा झाला आहे.

या बाबत आपण वेळोवेळी अधिकाऱ्यांशी चर्चा विचार विनिमय करून कुकडीच्या धरणातील उन्हाळी आवर्तन सोडण्याबाबत पाठपुरावा केलेला आहे. भविष्यातदेखील आवर्तनाच्या बाबतीमध्ये निश्चित स्वरूपात कर्जत तालुक्यातील शेतकरी व सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना आपल्या हक्काच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी जागरूक राहावे लागणार आहे .

राष्ट्रवादीने लावले राम शिंदे व सुजय विखेंवर बक्षीस

आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याने कुकडीचे आवर्तन सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोनासह विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. मात्र, कर्जत -जामखेडमधील भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार तथा माजी मंत्री राम शिंदे व विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील गायब आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर बक्षीस लावले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना व कुकडीच्या पाण्यावरून भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये चांगला संघर्ष पेटला आहे. समाज माध्यमावर सुंदोपसुंदी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी माजी मंत्री राम शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन तसेच भाजप चे जिल्हा प्रसिध्दीप्रमुख सचिन पोटरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आमदार रोहित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कर्जत शहर व युवक राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र सोडले. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष सुनील शेलार, युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रा. विशाल मेहेत्रे, सचिन सोनमाळी व दादासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.

सुनील शेलार म्हणाले, कोरोनाचे संकट कर्जत-जामखेडमध्ये आलेले असताना भाजपचे माजी मंत्री राम शिंदे व खासदार डॉ सुजय विखे यांनी कोणतीही मदत सर्वसामान्य जनतेला केली नाही. त्यांच्यासह सर्व भाजपचे कार्यकर्ते केवळ सोशल मीडिया आणि फेसबुकच्या माध्यमातून राष्ट्रवादीवर टीका करण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे तेथे थांबून जनतेला मदत कशी करता येईल यासाठी पुढे यावे, असा उपरोधिक सल्ला दिला आहे. आज जनता संकटात असताना हे नेते गायब आहेत.

प्रा.विशाल मेहत्रे यावेळी म्हणाले की जनता कोरोना च्या संकटात आणि भाजप मात्र सोशल मीडियाच्या व फेसबुकच्या प्रेमात अशी विचित्र परिस्थिती कर्जत-जामखेड मतदार संघामध्ये दिसून येत आहे.यामुळे पक्षाने चमकोगिरी न करता प्रत्यक्षात जनतेला मदत करावी.आमदार रोहित पवार हे कोरोना संकटात जनतेसाठी धावून आले आहेत ऑक्सीजन निर्मिती प्रकल6 तयार करण्या पासून कोव्हिडं सेंटर पर्यंत सर्व व्यवस्था त्यांनी केल्या आहेत तसे भाजपने काय केले हे जनतेला सांगावे असे सूचित केले आहे. ((Withdrawal of the petition in the court will end the cycle of kukadi))