मुलासाठी सासरी छळ, विवाहितेला काढले उपाशीपोटी घराबाहेर

सुर्यकांत वरखड
Tuesday, 1 December 2020

मुलगा होत नसल्याने सुनीता हिचा सासरी छळ होत होता. उपाशीपोटी तिला घराबाहेर हाकलून देऊन दमदाटी,  शिवीगाळ केली. भरोसा सेलमध्ये चौकशी झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला.

अहमदनगर : लग्नानंतर तीन मुली झाल्या. मुलगा होत नसल्याने सासरच्या मंडळीने विवाहितेला उपाशीपोटी घराबाहेर काढले. गव्हखेल (ता.आष्टी, जि. बीड) येथे ही घटना घडली. याबाबत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

प्रकाश उत्तम साखरे (पती), हौसाबाई उत्तम साखरे (सासू), उत्तम काशीनाथ साखरे (सासरे), विकास उत्तम साखरे (दीर), सही उत्तम साखरे (दीर), आशाबाई साखरे,  सुशाबाई साखरे (जाऊ) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत सुनीता प्रकाश साखरे (रा. गव्हखेल, ता. आष्टी, हल्ली रा. सैनिकनगर, भिंगार) यांनी पोलिसांत फिर्याद दिली.

त्यानुसार, 2011 मध्ये सुनीताचा विवाह प्रकाश साखरे यांच्याशी झाला. विवाहानंतर त्यांना तीन मुली झाल्या. मात्र, मुलगा होत नसल्याने सुनीता हिचा सासरी छळ होत होता. उपाशीपोटी तिला घराबाहेर हाकलून देऊन दमदाटी,  शिवीगाळ केली. भरोसा सेलमध्ये चौकशी झाल्यानंतर गुन्हा दाखल झाला.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The woman has been evicted by her father in laws congregation in ahmednagar for not having a child

Tags
टॉपिकस
Topic Tags: