
अहिल्यानगर : पुणे ते नगर दरम्यान एसटी बसने प्रवास करीत असताना वृद्ध महिलेच्या पर्समधील १६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्याने नजर चुकवून चोरून नेले. ही घटना ९ जून रोजी सकाळी ७ ते १० च्या कालावधीत घडली. या प्रवासादरम्यान सुपे येथून त्यांच्या शेजारी बसलेली व अक्षता गार्डनजवळ उतरलेल्या महिलेवर संशय व्यक्त करण्यात येत आहे.