
अकोले : चिंचोडी येथील यात्रेत दागिन्यांची चोरी करताना पाच महिलांना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले. नथाबाई देवराम गभाले, हिराबाई प्रकाश मधे आणि ताई किशोर गिन्हे या महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केला. त्यावेळी काही संशयित महिलांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांनी महिलांना पकडून चांगलाच चोप दिला.