esakal | Womens day 2021 राज्य सरकारकडून महिलांना विशेष गिफ्ट, कोरोना लसीकरणाबाबत घेतला निर्णय

बोलून बातमी शोधा

Womens day 2021 State government decides on corona vaccination}

कोरोना लसीकरणाबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Womens day 2021 राज्य सरकारकडून महिलांना विशेष गिफ्ट, कोरोना लसीकरणाबाबत घेतला निर्णय
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः जागतिक महिला दिनानिमित्त राज्य शासनाने महिलांना मोठे गिफ्ट दिले आहे. आज शासन निर्देशानुसार अंमलबजावणी केली जाणार आहे. नगर महापालिकेने शहरातील आठ ठिकाणी महिलांसाठी मोफत कोरोना लसीकरणाची सोय केली आहे.

45 वर्षांवरील कोमॉर्बिडिटी रुग्ण व 60 वर्षांवरील महिलांना त्याचा लाभ मिळणार आहे. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी संबंधित महिलांनी कोरोना लस टोचून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

महापालिकेतर्फे शहरातील सात आरोग्य केंद्रांत सध्या कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. त्यात 45 वर्षांवरील कोमॉर्बिडिटी रुग्ण, तसेच 60 वर्षांवरील रुग्णांना कोरोना लस देण्यात येत आहे.

त्यातील पाच आरोग्य केंद्रांत आज (सोमवारी) फक्‍त महिलांनाच कोरोना लस दिली जाणार आहे. त्यात महापालिकेची मुकुंदनगर, तोफखाना, भोसले आखाड्यातील जिजामाता व केडगाव येथील केंद्रे आणि जिल्हा रुग्णालयात कोरोना लस मोफत दिली जाणार आहे.

नगर महापालिकेने महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. कोरोना लसीकरण सेंटरवर महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. आतापर्यंत २१ हजार जणांना कोरोना लस दिली आहे.

-डॉ. अनिल बोरगे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका