आम्हाला पाणी मिळालेच पाहिजे

पाथर्डी पालिकेवर महिलांचा हंडा मोर्चा
Womens pot morcha on Pathardi municipality
Womens pot morcha on Pathardi municipalitySakal

पाथर्डी - गेल्या सात दिवसांपासून विस्कळित झालेला शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी शहराच्या विविध भागांतील महिलांनी पालिका कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. मोर्चाचे  नेतृत्व माजी नगरसेवक रामनाथ बंग व दीपाली बंग यांनी केले. आम्हाला पाणी मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत पालिका कार्यालय त्यांनी दणाणून सोडले.

शहरात गेल्या आठवड्यापासून पाणी सुटले नाही. यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांवर पाण्यासाठी फिरण्याची वेळ आली आहे. या पार्श्‍वभूमीवर आज बंग यांच्यासह विजया भागवत, अलका भागवत, मिनाज शेख, मुमताज शेख, अकिला बेग, शमा शेख, अर्चना देखणे, सलीम शेख, सचिन मुनोत, संजय कुलकर्णी, सागर बागडे, सचिन रत्नपारखी, दिलीप राऊत यांनी पालिका कार्यालयावर हंडा मोर्चा काढला.

रामनाथ बंग म्हणाले, की आम्ही एक वर्षाची पाणीपट्टी भरतो, मात्र पालिका एक दिवसाआड आम्हाला पाणी पुरवठा करते. गेल्या एक आठवड्यापासून शहराचा पाणी पुरवठा बंद असल्याने पाणी कुठून आणायचे, असा प्रश्न आमच्या समोर उपस्थित राहिला आहे. या योजनेचा वीजपुरवठा सुरळीत नसल्याने पाणीपुरवठा विस्कळित झाला, असे उत्तर आम्हाला दिले जाते. मात्र हा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी ही पालिकेची आहे. तातडीने पाणी सोडा अन्यथा आम्ही येथून उठणार नाही.

आश्‍वासनानंतर आंदोलन मागे

मोर्चाला पालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे व पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अशोक डोमकावळे हे सामोरे गेले. त्यांनी शेवगाव ते अमरापूरदरम्यान विजेचा तांत्रिक बिघाड सातत्याने होत असल्याने पाणीपुरवठा विस्कळित झाला असून, तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून हा बिघाड दूर करत पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com