जलस्वराज योजनेचे कार्य अंतिम टप्प्यात 

गौरव साळुंके
Sunday, 15 November 2020

शिरसगावसाठी 13 कोटी रुपयांचा निधी खर्च करून जिल्हा परिषदेने मंजूर केलेल्या जलस्वराज-दोन पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, डिसेंबरअखेर काम पूर्ण होणार आहे. पाण्याची टाकी, पाइपलाइन, यांची चाचणी पूर्ण झाली असून, पुढील दोन दिवसांत ग्रामस्थांना नळजोडणी मिळणार असल्याची माहिती सरपंच आबासाहेब गवारे यांनी दिली.

श्रीरामपूर (अहमदनगर) : शिरसगावसाठी 13 कोटी रुपयांचा निधी खर्च करून जिल्हा परिषदेने मंजूर केलेल्या जलस्वराज-दोन पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, डिसेंबरअखेर काम पूर्ण होणार आहे. पाण्याची टाकी, पाइपलाइन, यांची चाचणी पूर्ण झाली असून, पुढील दोन दिवसांत ग्रामस्थांना नळजोडणी मिळणार असल्याची माहिती सरपंच आबासाहेब गवारे यांनी दिली. 

शिरसगाव येथे मीटरद्वारे शुद्ध पाणी मिळणार असल्याने ग्रामस्थांची समाधान व्यक्त केले. गावाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी परिसरातील अशोक बंधाऱ्याच्या खोलीकरणाचे काम ग्रामपंचायतीने लोकसहभागातून केले. उन्हाळ्यात पाणीटंचाई व दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणी येत होत्या. यावर मात करण्यासाठी शिरसगाव ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यासाठी जिल्हा परिषदेकडे ग्रामपंचायतीने पाठपुरावा केल्याने शिरसगावसाठी जिल्हा परिषदेने जलस्वराज-दोन पाणीपुरवठा योजना मंजूर केली. त्यामुळे शिरसगाव ग्रामस्थांना मीटरद्वारे स्वच्छ पाणीपुरवठा होणार आहे. 

संपादन : अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The work of Jalaswaraj Yojana is in the final stage