न्यू आर्टसचे काम विद्यापीठात सर्वात सरस - कुलगुरू करमाळकर

दत्ता इंगळे
Friday, 4 December 2020

विद्यापीठाच्या मदतीने महाविद्यालयामध्ये सुरु असलेल्या ऑनलाईन शिक्षण प्रणालीच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करुन नजीकच्या कळात विद्यापीठातर्फे अतिरीक्त साधनसामग्री आणि तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले.

नगर तालुका ः कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षणामध्ये आलेल्या अड्‌थळ्यांवर ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा वापर करुन नगरच्या न्यू आर्टस महाविद्यालयाने संपूर्ण विद्यापीठांमध्ये पथदर्शी काम केले आहे, असे गौरवोद्‌गार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर यांनी काढले. 

ते महाविद्यालयातील प्राध्यपकांच्या ऑनलाईन शिक्षण प्रणाली उपयुक्तता आणि आवश्‍यकता या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. कुलगुरू करमाळकर म्हणाले, न्यु आर्टस महाविद्यालयाने जिल्ह्यातील इतर महाविद्यालयांना विद्यापीठाने विकसीत केलेल्या ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये मार्गदर्शन करुन सर्वच महाविद्यालयांमध्ये याचा प्रभावी वापर होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शकाची भुमिका बजवावी.

यावेळी त्यांनी महाविद्यायाच्या शैक्षणिक गुणवत्ता व नॅक मूल्यांकनाबाबत विशेष कौतुक केले. ही गुणवत्ता यापुढेही कायम टिकविण्याचे आवाहनही केले. 

या कार्यशाळेत विद्यापीठाच्या इनोव्हेटिव्ह लर्निंग सेंटरच्या संचालिका डॉ. अपुर्वा पालकर यांनी विद्यापीठातर्फे विकसित केलेल्या ऑनलाईन शिक्षण प्रणाली बद्दल चिकित्सक माहिती देऊन महाविद्यालयस्तरावर या शिक्षण प्रणालीच्या वापरासंबंधी उपयुक्त सूचना केल्या.

विद्यापीठाच्या मदतीने महाविद्यालयामध्ये सुरु असलेल्या ऑनलाईन शिक्षण प्रणालीच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करुन नजीकच्या कळात विद्यापीठातर्फे अतिरीक्त साधनसामग्री आणि तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. आजतागायत महाविद्यालयामध्ये झालेल्या ऑनलाईन व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या कामाचे कौतुक करुन भविष्यामध्ये याच गतीने ऑनलाईन शिक्षण प्रणाली विद्यार्थिभिमुख करण्याचे आवाहन केले. 

या कार्यशाळेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर झावरे यांनी स्वागत व प्रास्तविक केले. बी. सी. ए. विभाग प्रमुख डॉ. अरुण गांगर्डे यांनी या कार्यशाळेच्या सूत्रसंचालन केले. विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. अरुण पंदरकर यांनी आभार मानले. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The work of New Arts is the best in the university