श्रीगोंदे-दत्तवाडीत जलकुंभाच्या कामाची चौकशी; बांधकाम नियमानुसार असल्याचा पालिकेचा दावा

The work of water tank at Dattawadi of Shrigonde Municipality will be investigated
The work of water tank at Dattawadi of Shrigonde Municipality will be investigated

श्रीगोंदे (अहमदनगर) : नगरपालिका हद्दीतील दत्तवाडी येथे उभारलेल्या पाणीपुरवठा योजनेचा निधी प्रशासकीय मान्यता न घेता व कामाची कोणतीही ई-निविदा न काढता पूर्ण करण्यात आले. या तक्रारीनंतर जिल्हाप्रशासन अधिकारी डी.जी.लांघी यांनी प्रांताधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश केले आहेत. 

शहरातील सामाजिक कार्यकर्ते सतीश बोरुडे व अॅड. समीत बोरुडे यांनी या योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. बोरुडे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, या कामासाठी नेमलेल्या ठेकेदारास काम पूर्ण झाल्यानंतर नगराध्यक्ष यांची नमुना 64 वर सही नसतानाही बेकायदेशीरित्या कामाचे बिल अदा केले. या जलकुंभाच्या कामामध्ये पालिकेच्या तत्कालीन प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनी पालीकेचे आर्थिक नुकसान करीत भ्रष्टाचार केला. 

घोड धरणावरून 50 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना केंद्राच्या निधीतून पूर्ण केली. याचा पाणीपुरवठा योजनेचा निधी कोणतीही प्रशासकीय व तांत्रिक मान्यता नसताना तसेच कामाची निविदा न काढता शासन निर्णयाचे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे तत्कालीन नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्या प्रभाग दत्तवाडी येथे पंचवीस लाख रुपये खर्चाच्या दोन दशलक्ष लिटर क्षमतेचा उंच जलकुंभ बांधण्यात आला. 

सदरील कामासाठी सर्वसाधारण सभा घेवून प्रशासकीय व तांत्रिक मान्यता घेतली असल्याचे मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे कळविले. मात्र शासन निर्णयानुसार सक्षम प्राधिकाऱ्यांची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता प्राप्त केल्याशिवाय निविदा प्रसिद्ध करू नयेत व कार्यादेश देवू नयेत असे असतानाही सर्व नियम धाब्यावर बसवून आधी जलकुंभचे बांधकाम पूर्ण करून त्यानंतर तांत्रिक मान्यता मिळवून तत्कालीन मुख्याधिकारी विश्वंभर दातीर व पोटे यांनी संबंधित ठेकेदाराकडून केल्याचा आरोप बोरुडे यांनी केला. यावर लांघी यांनी चौकशीचे आदेश दिले. 

दत्तवाडी येथील पाणीयोजना नियमानुसारच आहे. घोड धरणावरुन आणलेल्या योजनेचाच तो भाग आहे. वाढीव योजना करण्याचा अधिकार पालिकेला असल्याने ही योजना तेथील लोकांची गरज लक्षात घेवून केली. मात्र काही लोकांना अर्धवट माहितीच्या आधारे पालिकेला बदनाम करण्याची सवय आहेत. आपण कुठल्याही चौकशीला तयार आहोत. 
- मनोहर पोटे, विद्यमान नगरसेवर, माजी नगराध्यक्ष.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com