
अहिल्यानगर : ६७ व्या महाराष्ट्र केसरीच्या गादी विभागातील अंतिम लढतीतवादग्रस्त चीतपट कुस्तीचा निर्णय देणारे पंच नीतेश काबलिए यांच्यावर राष्ट्रीय कुस्तीगीर महासंघाने तीन वर्षांची बंदी लादण्याचा निर्णय सोमवारी (ता.१४) जाहीर केला. अहिल्यानगर येथे झालेल्या या स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यातील लढतीत राक्षे चीतपट झाल्याचा पंच काबलिए यांनी दिलेला निर्णय वादग्रस्त ठरला होता. या निर्णयाला विरोध करताना मल्ल शिवराज राक्षे याने नंतर पंचांना मारहाण केली होती. यामुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, असे राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांनी सांगितले.