
कोपरगाव : कोपरगावमध्ये विविध विभागांचे अधिकारी चांगले कामे करण्याचा प्रयत्न करत आहे. जर काही चुका होत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही. सुरुवातीला मी सॉफ्ट भाषेत सांगतो; मात्र त्यांच्याकडून काही चुका झाल्यास प्रसंगी त्यांच्या विरोधात पुढची स्टेप घेण्यास कचरणार नाही. तुम्ही विश्वास ठेवलाय ना, काळजी करू नका, असे उपरोधिक भाष्य आमदार आशुतोष काळे यांनी युवानेते विवेक कोल्हे यांच्या बोलण्यावर केले.