दोघे होते लातूरचे, काकाकडे लपलेल्या प्रेयशीला संपवल्याने गेला जेलात कायमचा

सूर्यकांत वरकड
Tuesday, 27 October 2020

दुसऱ्या दिवशी गंज बाजारातील दुकानातून त्याने ऊसतोडीचा कोयता खरेदी केला. त्यास धार लावली. कोयता घेऊन तो बुरुडगाव रस्त्यावरील मोहिनीच्या काकाच्या घरी गेला. त्याने पुन्हा मोहिनीला लग्नासाठी मागणी घातली.

नगर : लग्नाला नकार दिल्याने धारदार शस्राने प्रेयसीचा खून करणाऱ्यास न्यायालयाने आज आजन्म कारावसाची शिक्षा केली. प्रदीप माणिक कणसे (वय 24, रा. रेणापूर, जि. लातूर) असे त्याचे नाव आहे. 

निलंगा (लातूर) तालुक्‍यातील मुलगी मोहिनी तानाजी पाटील ही सुटीत बुरुडगाव रस्त्यावरील मावस काकाकडे आली होती. मुलगी गावाकडे असताना, आरोपी कणसे लग्नासाठी तिच्यामागे लागला होता. 26 मे 2016 रोजी तो मित्रांसह येथे आला.

दुसऱ्या दिवशी गंज बाजारातील दुकानातून त्याने ऊसतोडीचा कोयता खरेदी केला. त्यास धार लावली. कोयता घेऊन तो बुरुडगाव रस्त्यावरील मोहिनीच्या काकाच्या घरी गेला. त्याने पुन्हा मोहिनीला लग्नासाठी मागणी घातली असता, तिने नकार दिला. त्या रागातून कोयत्याने वार करून त्याने मोहिनीचा खून केला. 

या बाबत कोतवाली पोलिस ठाण्यात खून व बाललैगिंक अत्याचारपासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलिस उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

या खटल्यात सरकार पक्षाने 19 साक्षीदार तपासले. काही साक्षीदार फितूरही झाले. सरकार पक्षाचा युक्तिवाद, पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने प्रदीप कणसे यास वरिलप्रमाणे शिक्षा केली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी बाजू मांडली. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A young man from Latur killed his girlfriend in Ahmednagar