पारनेरच्या रूईचौंढा धबधब्यात पुण्याचा तरूण वाहून गेला

मार्तंड बुचुडे
Monday, 26 October 2020

शिरूर येथील सहा मित्र धबधबा पाहण्यासाठी आज दुपारी पोहचले. तेथील सौंदर्य पाहून आनंदीत झाले. मात्र, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही.

पारनेर ः रूईचोंढा (ता. पारनेर) धबधबा पहाण्यासाठी शिरूर (जि. पुणे) येथून सहा तरुण आज (ता. 25 ) दुपारी दीड वाजता आले होते. फोटो काढण्यासाठी धबधब्याजवळ गेले असता पाय घसरून एकजण पाण्यात पडला.

तो खोल पाण्यात जावून बुडला. सहकाऱ्यांसह पोलिसांनी त्याचा शोध घेतला मात्र, रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नाही. दरम्यान, महिन्यापूर्वी एका पोलिस कर्मचाऱ्याचा धबधब्याजवळ बुडून मृत्यू झाला. 

श्रेयश नवनीत जामदार (वय 18, रा. शिरूर, जि. पुणे) असे त्याचे नाव आहे. अधिक माहिती अशी, सोशल मीडियावर सुंदर फोटो पाहून शिरूरच्या सहा तरुणांना रुईचौंडा धबधब्याची भूरळ पडली.

शिरूर येथील सहा मित्र धबधबा पाहण्यासाठी आज दुपारी पोहचले. तेथील सौंदर्य पाहून आनंदीत झाले. मात्र, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. फोटो काढत असताना यश धबधब्या जवळ पाण्यात उतरला. पाय घसरून तो पाण्यात बुडाला.

ही घटना दुपारी दीड वाजता घडली. मित्रांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना अपयश आले. धबधबा गावांपासून दूर असल्याने ही माहिती उशिराने पोलिसांना समजली. रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरू होते. 

दरम्यान, एक महिन्यांपूर्वी एका पोलिस एका रेल्वे पोलिस कर्मचाऱ्याचा असाच धबधब्याजवळ पाण्यात बुडून मृत्यू झाला. चार दिवसांपूर्वीच निघोज येथेही कुकडी नदीच्या पाण्यात पाय धुण्यासाठी गेलेला रांजणगाव गणपती यथील रिक्षा चालक पाण्यात वाहून गेला होता. त्याचा शोध अद्याप लागला नाही. तोच ही घटना घडली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The young man from Pune was swept away in Parner's Ruichaundha waterfall