
अहिल्यानगर : मशिदीत चेष्टा मस्करी करू नका, असे म्हटल्याचा राग येऊन सहा जणांच्या टोळक्याने तरुणास शिवीगाळ, दमदाटी करीत लाथा-बुक्क्यांनी व काहीतरी टणक धारदार वस्तूने डोक्यात मारहाण केली. तसेच दुकान व मोटारसायकलचे नुकसान केले. ही घटना मुकुंदनगर येथील गौसिया मशिदीजवळ १३ मार्च रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.