संकटात शोधली संधी! मुंबईत निर्माण केला खेड्यातल्या तरुणाने स्वत:च्याच दूधाचा ब्रँड

मार्तंड बुचुडे
Sunday, 6 September 2020

कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन झाले व सारेच उद्योग व्यवसाय अडचणीत सापडले आहेत.

पारनेर (अहमदनगर) : कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन झाले व सारेच उद्योग व्यवसाय अडचणीत सापडले आहेत. मात्र हेच संकट पाडळी रांजणगाव येथील तरूण गणेश करंजुले याच्या पथ्यावर पडले. त्याने गावात व परीसरात दुध संकलन करूऩ थेट पनवेल, खारघर, कळंबोली या परीसरात वितरण करण्यास सुरूवात केली. सध्या तो रोज तीन हजाराहून अधिक लिटर दुध विकत आहे. लवकरच पाच हाजार लिटर दुध त्याला लागणार आहे.

ग्रामिण भागात लॉकडाऊनमुळे दुधाचे दर कमी झाले. ते थेट 20 रूपयांच्याही आत आले. परिणामी दुधत्पादक शेतकऱ्यांचा मोठा तोटा झाला. त्याचा विचार करूण करंजुले याने गावात दुध खेरदी करूण थठे मुंबईस विकण्याचा विचार केला. त्याने तातडीने लगेचच तो व्यावसायही सुरू केला. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव देऊन तो सध्या थेट पनवेल व परीसरात दुध विकत आहे. त्याला दररोज तीन हजार लिटर दुध लागत आहे.

त्याच्या सकस आणि दर्जेदार दुधाला काही दिवसातच मागणी वाढली आहे. येत्या काही दिवसात हा आकडा पाच हजारांवर जाईल, असा विश्वास करंजुले याने व्यक्त केला आहे. करंजुले याने डेअरी सायन्यचा कोर्स केला आहे. मात्र नोकरीच्या मागे न लागता स्वतः चा उद्योग निर्माण करून तरूणांपुढे आदर्श निर्माण केला आहे. 

करंजुले यांनी कोरोनाच्या संकटातही संधी शोधली आहे. त्यांचे पाडळी रांजणगावमध्ये दुग्ध संकलन केंद्र आहे. याठिकाणी संकलित झालेल्या दूध ते मोठ्या डेअरींना पुरवत होते. आजही काही प्रमाणात दूध ते त्या ठिकाणी पाठवतात. मात्र समोरून जास्त दर मिळत नसल्याने या युवकाने संकलित केलेले दर्जेदार दूध पनवेल परिसरात वितरित करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी टँकरपासून सर्व यंत्रणा त्यांनी निर्माण केल्या आहेत. 
कामोठे येथे पाच हजार लिटर क्षमतेचे साठवणूक टाकी बसवण्यात आली आहे. कामोठेसह उलवे, कळंबोली, खारघर या भागात ते स्थानिक डेअरींना दूध पुरवठा करीत आहेत.

संपदान : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A young man from the village created his own milk brand in Mumbai