नुपूर शर्माचं स्टेटस ठेवल्याने तरुणावर हल्ला; आणखी आठ जणांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

नुपूर शर्माचं स्टेटस ठेवल्याने तरुणावर हल्ला; आणखी आठ जणांना अटक

कर्जत : येथील युवकावर हल्ला केल्याप्रकरणी आणखी आठ आरोपींना अटक करण्यात आली असून, आरोपींची संख्या आता चौदा झाली आहे. येथे सनी पवार या युवकास तू नूपुर शर्माचे स्टेटस ठेवतो, असे म्हणत लाथा-बुक्क्यासह शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली होती.

या प्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न, विना परवाना शस्त्र वापरासह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सहा आरोपींना पूर्वीच अटक करण्यात आली होती. आज (रविवारी) आठ फरार आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

आज अटक करण्यात आलेल्यांत शाहरुख आरिफ पठाण (वय २८), इलाई महबूब शेख (वय २०, दोघे रा. लोहारगल्ली, कर्जत), आकिब कुदरत सय्यद (वय २४, रा. हनुमानगल्ली, कर्जत), टिपू सरिम पठाण (वय १८), साहिल शौकत पठाण (वय २३), हर्षद शरीफ पठाण (वय २०, तिघे रा. लोहारगल्ली, कर्जत) निहाल इब्राहिम पठाण (वय २०, रा. हनुमानगल्ली, कर्जत) व एक विधीसंघर्षीत बालक यांचा समावेश आहे. या प्रकरणात अटक आरोपींची संख्या चौदा झाली आहे.

Web Title: Youth Attacked For Keeping Nupur Sharmas Status Eight More People Were Arrested

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..