
अहमदनगर : तळ्यात बुडून तरूणाचा मृत्यू
राहुरी - राहुरी फॅक्टरी येथे आज (सोमवारी) सकाळी सव्वाआठ वाजता वाणी मळ्यातील शेततळ्यात बुडून एका विवाहित तरूणाचा मृत्यू झाला. संदीप ज्ञानेश्वर दळे (वय ३२, रा. राहुरी फॅक्टरी) असे मृताचे नाव आहे. मृताच्या भावाने पोलिसांना दिलेल्या प्राथमिक जबाबात आत्महत्येचा संशय व्यक्त केल्याचे पोलीस कॉन्स्टेबल सुनील निकम यांनी सांगितले. मृत दळे यांचा कुंभार व्यवसाय आहे. घराजवळील शेततळ्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी आईच्या नावावर महिला बचत गटाचे व इतर कर्ज प्रकरणी केली होती. बऱ्याच दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होते. त्यात त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते.
कर्जबाजारीपणा व मानसिक तणावात त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता मृताच्या भावाने पोलिसांकडे व्यक्त केली. त्यांच्या मागे आई, वडील, एक भाऊ, दोन मुली असा परिवार आहे. राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली. उद्या (मंगळवारी) पंचनामा करुन, खात्री केल्यावर दळे यांनी आत्महत्या केली असल्यास तशी नोंद केली जाईल, असे पोलीस कॉन्स्टेबल निकम यांनी सांगितले.
Web Title: Youth Drowned In Lake Rahuri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..