Youth Dies While Swimming : मुळा धरणात बुडून एकाचा मृत्यू; 'मित्रांच्या समवेत पोहण्याचा मोह नडला, अन् काळाने डाव साधला'..
Mula Dam Drowning Accident : अहिल्यानगर औद्योगिक वसाहत परिसरातील सात-आठ मित्रांच्या समवेत रविवारी (ता. १८) मुळा धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. धरणातील पाणी पाहिल्यावर त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही. सर्वजण पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरले.
राहुरी : मुळा धरणाच्या पाण्यात मित्रांच्या समवेत पोहण्यासाठी उतरलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आज (मंगळवारी) सकाळी सहा वाजता धरणातील मत्स्योद्योग (केज) परिसरात मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला.