Police inspecting the crime scene at Bhairavnath temple after brutal murder of a youth.Sakal
अहिल्यानगर
Ahilyanagar Crime: कर्जत तालुका हादरला ! 'धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून'; जलालपूरतील भैरवनाथ मंदिरातील घटना..
Shocking Murder in Jalalpur : हनुमंत याच्या कपाळावर, नाकावर व कानावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. ही घटना काल (ता.२५) सकाळी ते सायंकाळदरम्यान घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सिद्धटेक : जलालपूर (ता. कर्जत) येथील हनुमंत श्रीरंग विटकर (वय ३५ वर्षे) या तरुणाचा जलालपूर गावातील भैरवनाथ मंदिरात खून झाला. हनुमंत याच्या कपाळावर, नाकावर व कानावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. ही घटना काल (ता.२५) सकाळी ते सायंकाळदरम्यान घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

